• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress ketaki mategaonkar share her experience about down payment and emi of new house pps

नव्या घराचं डाउन पेमेंट व EMIसाठी केतकी माटेगावकरने ‘अशी’ केली काटकसर, म्हणाली…

नवं घर घेण्यासाठी केतकी माटेगावकरने कशी केली पैशाची बचत? वाचा..

October 24, 2023 16:34 IST
Follow Us
  • केतकी माटेगावकर, जिनं बालपणापासून आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर केतकीनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
    1/12

    केतकी माटेगावकर, जिनं बालपणापासून आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर केतकीनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

  • 2/12

    ‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने केतकीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 3/12

    नुकताच केतकीचा ‘अंकुश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती रावीच्या भूमिकेत पाहायला मिळाली.

  • 4/12

    अशा या लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्रीने स्वप्न नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेतलं आहे.

  • 5/12

    तिने मुंबईतील एका इमारतीत १८व्या मजल्यावर नवं घर घेतलं आहे.

  • 6/12

    पण या घराचं डाउन पेमेंट आणि ईएमआय भरण्यासाठी कशाप्रकारे तिने काटकसर केली, याचा अनुभव तिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितला.

  • 7/12

    घराचं डाउन पेमेंट आणि ईएमआय विषयी बोलताना ती म्हणाली होती की, “अक्षरशः चांदण्या चमकायला लागतात. डाउन पेमेंटचे पैसे जमवता, जमवता पुरेवाट होते. पण मी अशा विचारांची आहे की, झालं ना. आता तुम्ही इतके दिवस शॉपिंगची मज्जा केली किंवा काय आवडलं तर लगेच ऑनलाइन ऑर्डर करायचं या सगळ्यांची मज्जा केली ना, असं मी स्वतःलाच समजवते. जर मोठ्या गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला संयमाची गरज असते.”

  • 8/12

    मी अक्षरशः सगळ्या गोष्टींवर पडदा टाकला. सगळे खर्च कमी केले. – केतकी माटेगावकर

  • 9/12

    “एक अशी वेळ होती की, तेव्हा मी माझ्या आईकडून दागिने घ्यायचे. माझ्या मैत्रिणीचे-बहिणीचे कपडे घातले आहेत. पण मी ठरवलं नाही म्हणजे नाही. मी शॉपिंग पण केली नाही. खूप ठरवून मी पैशांची बचत केली आणि भरपूर काम करतेय,” असं केतकी म्हणाली.

  • 10/12

    पुढे केतकी म्हणाली की, जेव्हा देवाच्या कृपेने फ्लॅट बूक केला त्या दिवसापासून काम सुद्धा प्रचंड वाढलं. ज्या दिवशी मी फ्लॅट बूक केला होता त्याच्या दुसऱ्याच आठवड्यात मला ‘मीरा’ चित्रपटाची ऑफर आली. हा प्रसाद ओकबरोबर येणारा माझा आगामी चित्रपट आहे. हे सगळं जुळून येतं.

  • 11/12

    जेव्हा तुम्ही मोठी उडी घेता तेव्हा ती गोष्ट पूर्ण व्हायला बाकीच्या गोष्टी सुद्धा मदत करतात. हे मी अनुभवलं आहे. डाउन पेमेंट करताना होईल का? होईल का? असं खूप वाटतं होतं – केतकी माटेगावकर

  • 12/12

    शेवटच्या क्षणापर्यंत ती रक्कम जमेपर्यंत पुरेवाट होते. पण ती रक्कम जमली. डाउन पेमेंट झाल्यानंतर जशी घराची चावी हातात आली, तशी मी खूप भावुक झाले, असा अनुभव केतकीने सांगितला.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress ketaki mategaonkar share her experience about down payment and emi of new house pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.