Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mr gay india 2023 winner vishal pinjani was beaten up by sister hrc

“…तर आमची लग्नं कशी होणार?” म्हणत ‘मिस्टर गे इंडिया २०२३’च्या विजेत्याला बहिणीने मारलेलं; म्हणाला, “ते मला…”

गे असण्याबाबत घरी सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल विशालने सांगितलं.

Updated: October 27, 2023 16:41 IST
Follow Us
  • कोल्हापूरच्या विशाल पिंजानीने ६ ऑक्टोबर रोजी यंदाची ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ ही स्पर्धा जिंकली. 
    1/15

    कोल्हापूरच्या विशाल पिंजानीने ६ ऑक्टोबर रोजी यंदाची ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ ही स्पर्धा जिंकली. 

  • 2/15

    सध्या तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्‍या ‘मिस्टर गे वर्ल्ड २०२३’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

  • 3/15

     ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत विशालने समलैंगिकता स्वीकारताना आलेल्या अनुभवांबदद्ल माहिती दिली.

  • 4/15

    “एकेदिवशी माझ्या एका मित्राने ‘तू गे आहेस का’? असं विचारलं. तेव्हापर्यंत मी गे हा शब्द ऐकलाही नव्हता. – विशाल पिंजानी

  • 5/15

    त्या शब्दाचा अर्थ माहीत नसल्याचं मी त्याला म्हणालो. त्याने ज्या टोनमध्ये तो शब्द वापरला, त्यावरून तो शब्द खूप वाईट असावा किंवा कुठलातरी आजार असावा असं मला वाटलं. – विशाल पिंजानी

  • 6/15

    मी ऑनलाइन हा शब्द शोधला आणि तेव्हा मला कळालं की गे म्हणजे समलैंगिक पुरुष. – विशाल पिंजानी

  • 7/15

     त्यानंतर मी गे आहे, असं मला समजलं. तोपर्यंत माझ्या भावनांमुळे मला असं वाटायचं की जगातील मी एकटाच असा पुरुष आहे, ज्याला स्त्रियांचं नाही तर पुरुषांचं आकर्षण आहे. – विशाल पिंजानी

  • 8/15

    वयाच्या १६ व्या वर्षी विशालला तो समलैंगिक असल्याची जाणीव झाली होती. आता तो ४० वर्षांचा आहे.

  • 9/15

    गे असण्याबाबत घरी सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल विशालने सांगितलं. तसेच बहिणीने मारल्याचा एक प्रसंगही सांगितला.

  • 10/15

    काही काळाने मी माझ्या लैंगिकतेबद्दल घरी सांगितलं, पण पालकांनी लगेच स्वीकारलं नाही. – विशाल पिंजानी

  • 11/15

    मी नैराश्यात होतो त्यामुळे त्यांनी माझी चांगली काळजी घेतली. – विशाल पिंजानी

  • 12/15

    कालांतराने त्यांच्या मनातील चुकीच्या धारणा मी त्यांना योग्य माहिती देऊन बदलल्या. – विशाल पिंजानी

  • 13/15

    एकेदिवशी रात्री बहिणीने उठून मला मारलं. ‘तू आमचं नाव खराब केलंस तर आमची लग्नं कशी होणार, आम्हाला स्थळं कशी येणार?’ असं तिचं म्हणणं होतं. – विशाल पिंजानी

  • 14/15

    “खरं तर त्यावेळी ते सगळे तसे का वागत होते, ते मला कळत होतं कारण त्यांना व्यक्त व्हायची दुसरी पद्धतच माहीत नव्हती,” असं विशाल म्हणतो.

  • 15/15

    सध्या विशाल मित्रांबरोबर मिळून समलैंगिक लोकांसाठी ‘अभिमान’ नावाची संस्था चालवतो. (सर्व फोटो – विशाल पिंजानी इन्स्टाग्राम)

TOPICS
कोल्हापूरKolhapurमनोरंजनEntertainment

Web Title: Mr gay india 2023 winner vishal pinjani was beaten up by sister hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.