-
अभिनेत्री उर्मिला निंबाळकर नेहमी चर्चेत असते.
-
मनोरंजनसृष्टीपासून दूर असलेली तरी उर्मिला युट्यूब आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
सध्या तिला लोकप्रिय युट्यूबर म्हणून अधिक ओळखलं जातं.
-
दर शुक्रवारी उर्मिला तिच्या युट्यूब चॅनेलवरून लाइफस्टाइल, मेकअप, ट्रॅव्हल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ शेअर करत असते. कधी कधी ती काही गंभीर विषयांवरही परखड मत मांडत असते.
-
शिवाय उर्मिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला देत असते. तसेच ती लेक अथांगचीही माहिती देत असते.
-
अशा या लोकप्रिय युट्यूबर उर्मिला निंबाळकरच्या लेक अथांगबरोबर काही दिवसांपूर्वी एक विचित्र घटना घडली होती.
-
उर्मिलाने लेकाबरोबर ही घडलेली घटना सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना एक कळकळीची विनंती केली होती.
-
उर्मिलाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहीलं होतं, “एक कळकळीची विनंती… एकेदिवशी संध्याकाळी मी, सुकीर्त आणि अथांग रस्त्यावर आकाशकंदील खरेदी करताना, मागून अचानक एक बाई आल्या. त्यांनी अथांगला अचानक मागून पकडले आणि जोरात त्याचे गाल ओढले. त्याने तो खूपच घाबरला आणि रडायला लागला.”
-
“ही बाळांमधील या वयातील अतिशय नैसर्गिक प्रतिक्रिया आहेत. त्याला ‘Stranger Danger’ असे वैज्ञानिक नावही आहे,” असं उर्मिला म्हणाली.
-
पुढे उर्मिला म्हणाली, “अथांगला व्हिडीओमध्ये पाहून त्याच्याविषयी प्रेमाची भावना असणे हे अगदी बरोबर आहे. पण २५ महिन्याच्या बाळाला त्याच्या इच्छेविरुद्ध ओढून त्याचे फोटो काढणे, तो रडत असतानाही त्याला ओढून स्वतःच्या जवळ खेचणे, बाहेरील अस्वच्छ हाताने बाळाला पकडणे, तो हात लावू देत नाही म्हणून पाठमोरे होऊन त्याला नावं ठेवत जाणे हे अयोग्य आहे आणि अथांगसाठी असुरक्षितही.”
-
“विचारल्यानंतर फोटोच काय तर घरी जेवायला सुद्धा येऊ आम्ही, परंतु आपल्या अट्टाहासात बाळाचे हाल करणे मला पटत नाही,” असं स्पष्ट मत उर्मिलाने या स्टोरीमधून मांडलं आहे.
-
दरम्यान, उर्मिलाच्या मनोरंजनसृष्टीतील कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने काही मालिका, चित्रपटात काम केलं आहे. तसेच ती हिंदी मालिकेतही झळकली आहे.
उर्मिला निंबाळकरच्या लेकाबरोबर नेमकी काय घडली होती विचित्र घटना? जाणून घ्या…
अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने ‘त्या’ घटनेनंतर चाहत्यांना केली होती कळकळीची विनंती
Web Title: What exactly happened with urmila nimbalkar son pps