Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi popular director actor and writer pravin tarde this two reasons mulshi pattern movie has not cross 100 crore pps

‘या’ दोन कारणामुळे ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊ शकला नाही; दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी व्यक्त केली होती खंत

‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाची १०० कोटींच्या क्लबमध्ये जायची ताकद होती, पण…. – प्रवीण तरडे

November 11, 2023 10:32 IST
Follow Us
  • लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांचा आज वाढदिवस.
    1/15

    लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांचा आज वाढदिवस.

  • 2/15

    तरडेंच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा बहुचर्चित आणि सुपरहिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटींच्या क्लबमध्ये का जाऊ शकला नाही? हे जाणून घेणार आहोत.

  • 3/15

    प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

  • 4/15

    २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकाही चांगलीच गाजली होती.

  • 5/15

    आजही ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत.

  • 6/15

    या सुपरहिट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. पण, हा चित्रपट १०० कोटींचं कलेक्शन जमवू शकला नाही.

  • 7/15

    ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील न होण्याची दोन कारण आहेत, जी स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी सांगत खंत व्यक्त केली होती.

  • 8/15

    काही महिन्यांपूर्वी ‘बोल भिडू’ या यूट्युब चॅनलवरील ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये सहभागी झाले होते. त्यावेळेस ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाविषयी बोलताना प्रवीण तरडे यांनी ही खंत व्यक्त केली होती.

  • 9/15

    प्रवीण तरडे म्हणाले होते की, ‘मुळशी पॅटर्न’ पाहण्यासाठी सकाळी साडेसहाचे शो लागले होते. इतके शो हाऊसफुल होऊ लागले होते. फक्त त्यावेळेस मीडियानं जरा सहकार्य करायला पाहिजे होतं.

  • 10/15

    पुढे तरडे म्हणाले की, कपिल, सागर आव्हाड यांनी मला खूप मदत केली. अमोल परचुरे, अतुल परचुरे या दोन भावांनीसुद्धा खूप मदत केली. पण काही पत्रकारांनी खोडसाळ बातम्या देऊन गुन्हेगारीचा चित्रपट असं दाखवलं.

  • 11/15

    “सगळ्यांनी ‘मुळशी पॅटर्न’ पाहिला. पुरस्कारही मिळाले, डोक्यावर घेऊन नाचले. पण, ज्या दिवशी चित्रपटगृहात तो खूप जोरात चालू होता, त्या वेळेस खोडसाळ पत्रकारांनी उगीचच गुन्हेगारीचा चित्रपट, असं कारण नसताना रंगवलं,” असं प्रवीण तरडे म्हणाले होते.

  • 12/15

    पुढे खंत व्यक्त करत तरडे म्हणाले की, शेतकऱ्यांचा एवढा मोठा चित्रपट होता. जर ‘मुळशी पॅटर्न’ला ‘ए’ सर्टिफिकेट दिलं नसतं आणि खोडसाळ पत्रकारांनी गुन्हेगारीचा चित्रपट म्हणून रंगवलं नसतं, तर ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटी क्रॉस केलेला चित्रपट असता.”

  • 13/15

    “कारण तळागाळातल्या समाजाचा मातीचा प्रश्न सांगणारा चित्रपट हा सुपरहिटच होतो आणि तो झालाच. खूप पैसे कमवले; पण १०० कोटींच्या क्लबमध्ये त्याची जायची ताकद होती,” असं प्रविण तरडे म्हणाले.

  • 14/15

    दरम्यान, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा हिंदी रिमेकही बनवला होता.

  • 15/15

    हिंदीत या चित्रपटाचं नाव ‘अंतिम’ असं होतं. या चित्रपटात सलमान खान व आयुष शर्मा मुख्य भूमिकेत होते.

TOPICS
प्रवीण तरडेPravin TardeमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Marathi popular director actor and writer pravin tarde this two reasons mulshi pattern movie has not cross 100 crore pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.