-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.
-
गेली अनेक वर्ष त्या विविध मालिका, नाटक व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ‘रुपाली राजाध्यक्ष’ ही भूमिका साकारत आहेत.
-
ऐश्वर्या नारकर यांनी दिवाळीनिमित्त नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
नाकात नथ, पोपटी रंगाची साडी, गळ्यात नेकलेस असा पारंपरिक लूक अभिनेत्रीने दिवाळीनिमित्त केला होता.
-
यावेळी त्यांच्या गळ्यातील नेकलेसने विशेष लक्ष वेधून घेतलं.
-
ऐश्वर्या नारकर यांनी गळ्यात पारिजातकाची नक्षी असलेला नेकलेस परिधान केला होता.
-
या पारिजातकाच्या नेकलेसला साजेसे असे कानातले त्यांनी घातले होते.
-
ऐश्वर्या नारकरांच्या या सुंदर लूकवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दिवाळीनिमित्त ऐश्वर्या नारकरांचा पारंपरिक लूक! गळ्यातील पारिजातकाच्या नेकलेसने वेधलं लक्ष, पाहा फोटो
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम ऐश्वर्या नारकरांच्या गळ्यातील नेकलेसने वेधलं लक्ष, पाहा फोटो…
Web Title: Aishwarya narkar traditional diwali look viral on social media actress beautiful necklace grabs attention sva 00