-
दिवाळीच्या मुहूर्तावर सध्या कलाकार मंडळी नवं घर आणि आलिशान गाड्या खरेदी करताना दिसत आहेत.
-
कलाकार मंडळी सोशल मीडियावर नव्या गाडीबरोबर किंवा घराचे फोटो शेअर करत आहेत.
-
सध्या ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी-दिघे यांनी खरेदी केलेल्या आलिशान गाडीची चांगलीच चर्चा सुरू आहे.
-
“नवीन सदस्याचं आमच्या घरी स्वागत आहे,” असं कॅप्शन लिहीत प्राजक्ता यांनी गाडीबरोबरचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
नव्या आलिशान गाडीचं कुटुंबात स्वागत करताना अभिनेत्रीबरोबर त्यांचे पती आणि मुलगाही उपस्थित होता.
-
पण प्राजक्ता यांनी खरेदी केलेल्या या आलिशान गाडीची किंमत माहितेय का?
-
प्राजक्ता यांनी मर्सिडीज बेंझ खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तब्बल ६० ते ७० लाखांपासून सुरू होते.
-
मराठी सिनेसृष्टीतील खूप कमी कलाकारांकडे एवढ्या किंमतीची आलिशान गाडी आहे.
-
पण आता आलिशान गाडी असणाऱ्या या यादीमध्ये प्राजक्ता कुलकर्णी-दिघे यांचं नाव ही सामील झालं आहे.
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने खरेदी केलेल्या आलिशान गाडीची किंमत माहितेय का? ऐकून व्हाल थक्क
दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्रीने खरेदी केलेल्या ‘या’ आलिशान गाडीची किंमत जाणून घ्या…
Web Title: Tharla tar mag fame actress prajakta kulkarni dighe bought a new car know about this car price pps