• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. parineeti chopra was offered role of rashmika mandanna in animal ranbir kapoor know details jshd import hrc

परिणीती चोप्राला ऑफर झालेला ‘अ‍ॅनिमल’, मग रश्मिका मंदानाची वर्णी कशी लागली? जाणून घ्या

परिणीती चोप्राला ऑफर झालेला ‘अ‍ॅनिमल’, मग असं काय घडलं की रश्मिका मंदाना झळकली? वाचा

Updated: December 2, 2023 13:55 IST
Follow Us
  • animal release
    1/12

    रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ( चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 2/12

    या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाचे सोशल मीडिया यूजर्स कौतुक करत आहेत. (फोटो – रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)

  • 3/12

    लोक रणबीर कपूरच्या अभिनयाचे आणि चित्रपटातील त्याच्या अ‍ॅक्शनचे कौतुक करत आहेत, तर रश्मिका मंदानानेही तिच्या व्यक्तिरेखेने लोकांना प्रभावित केले आहे.

  • 4/12

    रश्मिकाने या चित्रपटात गीतांजली सिंह नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ( चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 5/12

    पण तुम्हाला माहित आहे का की रश्मिकाच्या आधी ही भूमिका परिणीती चोप्राला ऑफर झाली होती. २०२१ मध्ये जेव्हा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा यात परिणीतीला घेण्यात आल्याची चर्चा झाली होती. (फोटो : @parineetichopra/instagram)

  • 6/12

    पण नंतर परिणितीला रिप्लेस करण्यात आले, ज्यामुळे तिचे चाहते चांगलेच नाराज झाले. ( चित्रपटातून स्क्रीनशॉट)

  • 7/12

    आता या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी परिणीतीच्या जागी रश्मिकाला ही भूमिका का देण्यात आली याचा खुलासा केला आहे. (फोटो – रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)

  • 8/12

    संदीपने सांगितल की, जेव्हा या चित्रपटासाठी ट्रायल घेण्यात आली तेव्हा परिणीती या भूमिकेसाठी योग्य वाटली नाही. परिणीतीला चित्रपटातून वगळल्यानंतर ती निराश झाली होती. (फोटो : @parineetichopra/instagram)

  • 9/12

    मात्र, दिग्दर्शकाचं म्हणणं प्रेक्षकांना पटलेलं नाही. दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाला कॅश करण्यासाठी रश्मिकाला कास्ट करण्यात आलं, असं त्यांचं मत आहे. (फोटो – रश्मिका मंदान्ना इन्स्टाग्राम)

  • 10/12

    त्याचवेळी, परिणीतीच्या चाहत्यांचा असा विश्वास आहे की परिणीतीनेच या चित्रपटासाठी नकार दिला असावा. (फोटो स्रोत: @parineetichopra/instagram)

  • 11/12

    चाहत्यांचे म्हणणे आहे की चित्रपटात रणबीर आणि रश्मिका यांच्यात अनेक रोमँटिक दृश्ये आहेत. परिणीती आप नेते राघव चड्ढा यांच्याशी लग्न करणार होती, त्यामुळे पडद्यावर असे सीन करणं तिच्यासाठी सोयीचं नव्हतं. तसेच परिणीतीकडे आधीच अनेक चित्रपट आहेत, त्यामुळे तिने चित्रपटातून काढता पाय घेतला असावा, असं म्हटलं जातंय. (फोटो: @parineetichopra/instagram)

  • 12/12

    परिणीती चोप्रा नुकतीच अक्षय कुमारसोबत ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच ही अभिनेत्री दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’ चित्रपटात दिसणार आहे. हा एक बायोपिक चित्रपट आहे जो दिग्गज पंजाबी गायक अमर सिंग चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)

TOPICS
परिणीती चोप्राParineeti Chopraफोटो गॅलरीPhoto Galleryरणबीर कपूरRanbir Kapoorरश्मिका मंदानाRashmika Mandanna

Web Title: Parineeti chopra was offered role of rashmika mandanna in animal ranbir kapoor know details jshd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.