-
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. जवळपास ६ वर्षांनंतर ही जोडी एकत्र दिसणार आहे. याची माहिती खुद्द कपिल शर्माने एका पोस्टद्वारे दिली आहे. (कपिल शर्माने शेअर केलेल्या व्हिडिओतील फोटो)
-
कपिलने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याच्यासोबत सुनील ग्रोव्हरही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांसोबत हसत, मस्करी करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर, हा कपिलच्या नवीन शोचा प्रोमो आहे जो नेटफ्लिक्सवर येणार आहे. (फोटो – कपिल शर्मा शोमधील)
-
या प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेक, किकू शारदा, राजीव ठाकूर आणि अर्चना पूरण सिंह देखील दिसत आहेत. प्रोमोमध्ये कपिल आणि सुनील टूरवर जाण्याविषयी बोलत आहेत, ज्यावर सुनील म्हणतो की, तो ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. (फोटो – कपिल शर्मा शोमधील)
-
यावर कपिल म्हणतो की, त्याला जावे लागेल, त्यानंतर सुनीलने कपिलसमोर एक अट ठेवली. ते म्हणतो की, ते विमानाने नाही तर रस्त्याने जातील. ( फोटो – कपिल शर्मा शोमधील)
-
2017 मध्ये ऑस्ट्रेलियाहून परतताना फ्लाइटमध्ये कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाला होता, त्यानंतर सुनील ग्रोव्हरने कपिल शर्माचा शो सोडला होता. (फोटो – कपिल शर्मा शोमधील)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्याची टीम ऑस्ट्रेलियाहून एक शो करून भारतात परतत होती, तेव्हा कपिलने दारूच्या नशेत सुनिल ग्रोव्हरशी असभ्य वर्तन केले, जेव्हा त्याची संपूर्ण टीम जेवत होती, तेव्हा त्याला राग आला आणि त्याने बूट काढून सुनिल ग्रोव्हरवर फेकला. त्याने सुनील ग्रोव्हरची कॉलरही पकडली. (फोटो – कपिल शर्मा शोमधील)
-
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर कपिल आणि सुनीलमध्ये पुन्हा एकदा मैत्री झाल्याचे कळते. जवळपास ६ वर्षांनंतर हे दोघेही आपापली नाराजी विसरून पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र काम करणार आहेत. कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली, त्यामुळे चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. (फोटो – कपिल शर्मा शोमधील)
कपिल शर्मा- सुनील ग्रोव्हरचा वाद अखेर मिटला, ६ वर्षांनी पुन्हा दिसणार एकत्र
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्सवरील एका नवीन शोमध्ये दोघेही ६ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत.
Web Title: Kapil sharma and sunil grover came together after 6 years on netflix show know what caused the fight between these comedians jshd import sjr