-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते-दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखलं जातं. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी ५ डिसेंबर १९९८ मध्ये मेघना यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचा आज २५ वा वाढदिवस आहे.
-
लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त रवी जाधव यांनी बायकोबरोबरचे काही Unseen फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मेघना आणि रवी जाधव यांची लव्हस्टोरी सुद्धा फारच फिल्मी आहे.
-
मेघना म्हणजे रवी जाधव यांच्या जवळच्या मित्राची बहीण. मित्राच्या घरी येणं-जाणं वाढल्यावर रवी आणि मेघना यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.
-
१४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी दिग्दर्शकाने मेघना यांना लग्नाची मागणी घातली होती.
-
रवी जाधव यांना होकार देण्यापूर्वी मेघना यांनी पूर्ण १ महिना विचार केला होता.
-
मेघनाच्या वडिलांनी लग्नापूर्वी रवी जाधव यांना एक महत्त्वाची अट घातली होती ती म्हणजे स्वत:चं घर घ्यावं.
-
सासऱ्यांची अट मान्य करत त्यांनी मोठ्या कष्टाने स्वत:चं घर उभं केलं आणि मेघनाशी लग्न केलं.
-
आज दोघांच्या सुखी संसाराला २५ वर्षे पूर्ण झाली असून या जोडप्याला एक मुलगा आहे.
मित्राची बहीण ते सासऱ्यांची अट, ‘अशी’ आहे रवी जाधव यांची प्रेमकहाणी, सुखी संसाराला झाली २५ वर्षे!
रवी जाधव यांच्या लग्नाला पूर्ण झाली २५ वर्षे! दिग्दर्शकाने शेअर केले Unseen फोटो…
Web Title: Marathi director ravi jadhav 25th marriage anniversary know their beautiful love story sva 00