-
गुगलच्या यादीत ‘जवान’ पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये या चित्रपटाला सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.
-
सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर 2′ हा गुगलवर वर्षातील दुसरा सर्वाधिक सर्च केलेला चित्रपट आहे. गदर 2’ हा 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर एक प्रेम कथा’चा सीक्वल होता.
-
‘जवान’ आणि ‘गदर 2’ नंतर हॉलिवूड चित्रपटाने यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या दोन चित्रपटांनंतर ‘ओपनहायमर’ हा चित्रपट गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला.
-
या यादीत ‘आदिपुरुष’ चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे. रामायणावर आधारित हा चित्रपट त्याच्या वादग्रस्त संवादांमुळे चर्चेत आला होता.
-
शाहरुख खानचा पठाण’ चित्रपट या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
-
अभिनेत्री अदा शर्माचा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट सहाव्या क्रमांकावर आहे. धर्मांतराच्या मुद्द्यावर बनलेला हा चित्रपटही वादात सापडला होता.
-
सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या अॅक्शनने भरलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. यावर्षी सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश झाला आहे.
-
थलपथी विजय वत्रिशा कृष्णन यांची भूमिका असलेल्या लिओ चित्रपट चांगलाच गाजला. गुगलच्या यादीत लिओ आठव्या क्रमांकावर आहे.
-
सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. गुगलच्या यादीत हा चित्रपट नवव्या क्रमांकावर आहे.
-
साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा सुपरहिट चित्रपट ‘वारीसू’चा या यादीत १० वा क्रमांक लागतो . बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती.
Google Search : ‘पठाण’पासून ‘टायगर ३’ पर्यंत, २०२३ मध्ये ‘या’ १० चित्रपटांना गुगलवर केले सर्वाधिक सर्च
या वर्षात जगभरात अनेक हिंदी चित्रपट हिट झाले. गुगलने २०२३ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आणखी कोणते चित्रपट समाविष्ट आहेत? जाणून घ्या
Web Title: Google search 2023 top 10 movies shah rukh khan jawan pathan tiger 3 dpj