-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखलं जातं.
-
काही महिन्यांपूर्वीच सईने मुंबईतील मालाड परिसरात तिचं पहिलं हक्काचं घर खरेदी केलं.
-
२००५ मध्ये सांगलीहून मुंबईत आल्यावर सई एवढी वर्षे भाड्याच्या घरात राहत होती.
-
अभिनेत्री मुंबईत आल्यापासून आई-बाबांच्या, नातेवाईकांच्या आणि भाड्याच्या अशा एकूण १० घरांमध्ये राहिली.
-
यामुळेच सईने तिच्या नव्या आलिशान घराला ‘द इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.
-
सईने तिच्या नव्या घराचा संपूर्ण व्हिडीओ युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.
-
तिच्या नव्या घराच्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
या नव्या घरात गृहप्रवेश करताना सईने सुंदर अशी साडी नेसली होती.
-
अभिनेत्रीचं ‘द इलेव्हन्थ प्लेस’ हे नवीन घर मुंबईतील मालाडमध्ये ४५ व्या मजल्यावर आहे.
-
घर ४५ व्या मजल्यावर असल्यानेच तिच्या घराच्या मोठ्या खिडक्यांमधून अतिशय सुंदर व आकर्षक व्ह्यू पाहायला मिळतो.
-
नव्या घरातून सकाळी आणि रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर कसा दिसतो याचे वेगवेगळे फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
सई ताम्हणकरने शेअर केलेल्या व्हिडीओ व फोटोंमध्ये तिच्या घरातील वॉकिंग वॉर्डरोब, प्रशस्त खोल्या, सुंदर व्ह्यू, आकर्षक फर्निचरची झलक पाहायला मिळते.
-
दिवाळीत सईने तिच्या नव्या घरी प्रिया बापट, सारंग साठ्ये, कादंबरी कदम, समीर विध्वंस, उमेश कामत या कलाकारांना आमंत्रित केलं होतं.
-
या नव्या घरात शिफ्ट होण्यापूर्वी जुन्या भाड्याने राहत असलेल्या घराचा निरोप घेताना सई काहीशी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
-
सई ताम्हणकरच्या नवीन घरातून दिसणारा सुंदर व्ह्यू ( सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )
सई ताम्हणकरचं मुंबईतील आलिशान घर पाहिलंत का? ४५ व्या मजल्यावरून दिसतो सुंदर व्ह्यू, पाहा फोटो
मुंबईतील ‘या’ भागात आहे सई ताम्हणकरचं आलिशान घर, पाहा Inside फोटो…
Web Title: Sai tamhankar buys new lavish flat in mumbai actress shares beautiful photos sva 00