• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. animal fame upendra limaye son is big fan of ranbir kapoor actor shares special incident sva

उपेंद्र लिमयेंच्या लेकाची ‘अ‍ॅनिमल’बद्दल होती ‘अशी’ प्रतिक्रिया, रणबीर कपूरसाठी पाठवलेला खास निरोप; किस्सा सांगत म्हणाले…

उपेंद्र लिमयेंच्या लेक आहे रणबीर कपूरचा चाहता, सांगितला ‘अ‍ॅनिमल’च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा…

December 29, 2023 21:02 IST
Follow Us
  • animal fame upendra limaye son is big fan of ranbir kapoor
    1/15

    अभिनेते उपेंद्र लिमये सध्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

  • 2/15

    रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये त्यांनी फ्रेडी पाटील ही शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची भूमिका साकारली आहे.

  • 3/15

    उपेंद्र यांनी साकारलेल्या फ्रेडीचा १० ते १५ मिनिटांचा सीन प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहतो.

  • 4/15

    उपेंद्र लिमयेंचा मुलगा वेद हा रणबीर कपूरचा खूप मोठा चाहता आहे.

  • 5/15

    आपले बाबा रणबीरबरोबर काम करणार हे समजल्यावर उपेंद्र लिमयेंच्या लेकाने रणबीरसाठी खास निरोप पाठवला होता.

  • 6/15

    रणबीर कपूरप्रमाणे उपेंद्र यांचा लेक वेद लिमये देखील फुटबॉल या खेळाचा चाहता आहे.

  • 7/15

    ‘अ‍ॅनिमल’बद्दल समल्यावर वेद उपेंद्र यांना म्हणाला, “चित्रपटासाठी मी आनंदी आहेच. पण, बाबा प्लीज माझा एक निरोप रणबीरला दे. त्याला सांग मला तो खरंच खूप आवडतो. अभिनेता म्हणून तो उत्तम आहेच. पण रणबीर बारसा या फुटबॉल (बार्सिलोना) टीमचा चाहता आहे आणि मलाही ती टीम प्रचंड आवडते.”

  • 8/15

    उपेंद्र लिमयेंच्या मुलाचा निरोप ऐकून रणबीर सेटवर प्रचंड आनंदी झाला होता. तसेच त्याने वेदला सेटवर बोलावून घ्या असं सांगितलं होतं.

  • 9/15

    याबद्दल सांगताना उपेंद्र लिमये म्हणाले, “तुझ्या लेकाला इथे बोलावून घे, आम्ही फुटबॉलबद्दल एकत्र गप्पा मारू असं रणबीरने मला सांगितलं आणि मी लगेच वेदला फोन केला. पण, वेद तेव्हा नेमका माझा फोन उचलत नव्हता.”

  • 10/15

    “त्याची क्रिकेट मॅच सुरू असल्याने रात्री लेट त्याने माझे मेसेज पाहिले. त्या दोघांची भेट होऊ शकली नाही. मॅच संपल्यावर रणबीरला भेटण्यासाठी वेद नॉनस्टॉप फोन करत होता. पण तोपर्यंत आमचं पॅकअप झालेलं होतं.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.

  • 11/15

    वेळेअभावी उपेंद्र लिमयेंचा लेक व रणबीरची भेट होऊ शकली नव्हती.

  • 12/15

    रणबीरचं कौतुक करत उपेंद्र लिमये म्हणाले, “कलाकारांचं दुनियेने आमच्याकडे लक्ष द्यावं असं वागणं असतं. पण, रणबीर तुमच्या आजूबाजूला वावरतोय हे कोणाला कळणार देखील नाही.”

  • 13/15

    रणबीरप्रमाणे उपेंद्र लिमयेंनी ‘अ‍ॅनिमल’चा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचंही भरभरून कौतुक केलं.

  • 14/15

    ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसह, रश्मिका, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 15/15

    दरम्यान, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ८५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Animal fame upendra limaye son is big fan of ranbir kapoor actor shares special incident sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.