-
नुकताच करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो ‘कॉफी विथ करण’ च्या 8 व्या सीझनच्या नवीन भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे. नवीन एपिसोडमध्ये कपूर बहिणी म्हणजेच जान्हवी कपूर आणि खुशी कपूर एकत्र दिसणार आहेत.
-
या प्रोमोमध्ये जान्हवी आणि खुशी त्यांच्या स्टायलिश अवतारात दिसत आहेत.
-
एका बाजूला जान्हवी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे तिची बहीण खुशीने लाइट येलो रंगाचा ड्रेस निवडला.
-
प्रोमोमध्ये करण जोहर जान्हवी आणि खुशी यांना अनेक वैयक्तिक प्रश्न विचारताना दिसत आहे.
-
रॅपिड फायर राउंड दरम्यान, जान्हवी आणि खुशी त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसतात.
-
करणने जान्हवीला विचारले की तिने तिच्या मोबाईलमध्ये स्पीड डायलवर सेव्ह केलेले तीन नंबर कोणाचे आहेत?
-
या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेत्रीने पहिल्या क्रमांकावर तिचे वडील बोनी कपूर यांचे नाव घेतले.
-
जान्हवीने तिची बहीण खुशी कपूरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर घेतले.
-
अभिनेत्रीने तिसर्या क्रमांकावर तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाचे नाव घेतले.
-
दरम्यान, जान्हवी कपूर अनेकदा शिखर पहारियासह काही कार्यक्रम आणि धार्मिक स्थळांना हजेरी लावताना दिसते.
(फोटो : @karanjohar/instagram)
वडील, खुशी अन्…; जान्हवी कपूरच्या स्पीड डायल लिस्टमधील तिसरं नाव ऐकून चकित व्हाल
जान्हवी कपूर आणि तिची बहीण खुशीने करण जोहरचा टॉक शो ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये वैयक्तिक आयुष्याबाबत केले अनेक खुलासे
Web Title: Janhvi kapoor three people phone number on speed dial including boyfriend shikhar pahariya jshd import hrc