-
बॉलीवूडमधील सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक बिपाशा बसू सध्या तिच्या पती आणि मुलीसोबत मालदीवमध्ये वेळ घालवत आहे.
-
४५ वर्षीय अभिनेत्री आजकाल चित्रपटांपासून दूर आहे, तरीही ती कोट्यवधी रुपये कमवते.
-
२०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘अलोन’ चित्रपटात ही अभिनेत्री शेवटची लीड रोलमध्ये दिसली होती.
-
२०१६ मध्ये करण सिंह ग्रोवरशी लग्न केल्यानंतर ती रुपेरी पडद्यावर दिसली नाही.
-
पण आजही बिपाशा तशीच लक्झरी लाइफ जगत आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिपाशाची एकूण संपत्ती जवळपास १३० कोटी रुपये आहे.
-
एकेकाळी बिपाशा तिचा नवरा करणपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत होती. पण आता तिच्या पतीची संपत्ती तिच्यापेक्षा जास्त आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करणची एकूण संपत्ती २२४ कोटी रुपये आहे.
-
बिपाशा बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे, तर तिचा नवरा करण हा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता होता. आता टीव्हीनंतर करण चित्रपटांमध्येही नशीब आजमावत आहे.
-
मात्र, चित्रपटांपासून दूर राहूनही बिपाशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करत आहे. एकीकडे बिपाशा एका चित्रपटातून ३ ते ४ कोटी रुपये कमावते, तर दुसरीकडे ती ब्रँड एंडोर्समेंटसाठी २ कोटी रुपये घेते.
-
बिपाशा वांद्रे येथील एका आलिशान घरात राहते, ज्याची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आहे. तिच्याकडे इतर अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत.
-
बिपाशाकडे काही लक्झरी कार आहेत ज्यात ऑडी क्यू, टोयोटा फॉर्च्युनर इत्यादी ब्रँडच्या कारचा समावेश आहे.
(फोटो : @bipashabasu/instagram)
एकेकाळी पतीपेक्षा जास्त होती बिपाशा बासूची संपत्ती, आता करण सिंह ग्रोव्हर आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक
बिपाशा बासूने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपण तिच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.
Web Title: Alone actress bipasha basu net worth once she was rich than husband karan singh grover jshd import hrc