-
काही वर्षांपूर्वी झी मराठीवरील ‘उंच माझा झोका’ ही मालिका खूप गाजली होती.
-
या मालिकेचे दिग्दर्शन विरेंद्र प्रधान यांनी केले होते.
-
या मालिकेत अभिनेत्री तेजश्री वालावलकरने ‘रमाबाई रानडे’ यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.
-
सध्या सोशल मीडियावर तेजश्रीच्या ग्लॅमरस अंदाजाची चर्चा सुरू आहे.
-
अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात तेजश्री तीन वर्षांची असतानाच झाली होती.
-
‘गोष्ट एका जप्तीची’ या मालिकेतही तेजश्रीने काम केले होते.
-
तेजश्रीने ‘मात’ आणि ‘चिंतामणी’ या दोन चित्रपटांमध्ये काम केले होते.
-
‘मात’ या चित्रपटासाठी तेजश्रीला शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
-
दहावी झाल्यानंतर तेजश्रीने ‘झिंदगी नॉट आउट’ ही मालिका केली होती.
-
गेल्याच वर्षी कला शाखेत तेजश्रीने पदवी मिळवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री वालावलकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘उंच माझा झोका’ मालिकेतील छोट्या ‘रमा’चा ग्लॅमरस अंदाज; पाहा खास फोटो
या मालिकेचे दिग्दर्शन विरेंद्र प्रधान यांनी केले होते.
Web Title: Uncha maza zoka tv serial fame actress tejashree walavalkar glamorous look photos viral sdn