-
ख्वाजा अहमद अब्बास लिखित आणि राज कपूर दिग्दर्शित आणि निर्मित ‘बॉबी’ हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातून या दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
हा चित्रपट त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा ठरला. हा चित्रपट पर्शियन भाषेतही बनला होता आणि त्याचे नाव होते ‘परवाज दर गफास’.
-
‘बॉबी’चं बजेट १.२० कोटी होते आणि या चित्रपटाने जगभरात २९.९० कोटींचे कलेक्शन होते.
-
राजेश खन्ना आणि डिंपल यांनी ‘बॉबी’ चित्रपट रिलीज होण्याच्या आठ महिने आधी लग्न केले होते. मार्च १९७३ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि हा चित्रपट नोव्हेंबर १९७३ मध्ये प्रदर्शित झाला.
-
इतकंच नाही तर ‘अक्सर कोई लडकी’ गाण्याच्या वेळी डिंपल प्रेग्नंटही असल्याचं सांगण्यात येत आहे.
-
हा चित्रपट बनवण्यासाठी राज कपूर यांनी कुख्यात गँगस्टर करीम लाला यांच्याकडून पैसे उधारीवर घेतले होते.
-
‘मेरा नाम जोकर’ फ्लॉप झाल्यानंतर राज कपूर यांचे बरेच पैसे बुडाले होते. त्यामुळेच त्यांनी हा पर्याय निवडला.
-
इतकंच नव्हे तर हा चित्रपट बनवण्यासाठी राज कपूर यांनी आपल्या पत्नीचे दागिनेदेखील गहाण ठेवले होते.
-
रेखा यांची बहीण राधा १९७० च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल होती. राज कपूर यांनी तिला ‘बॉबी’च्या भूमिकेसाठी विचारलं होतं. पण तिला अभिनय करायचा नसल्याने तिने नकार दिला होता. (सर्व फोटो सौजन्य : आयएमडीबी, इंडियन एक्सप्रेस)
गँगस्टरकडून घेतलेले पैसे, बायकोचे दागिने ठेवले गहाण; ‘बॉबी’साठी राज कपूर यांनी असं का केलेलं? जाणून घ्या
‘बॉबी’चं बजेट १.२० कोटी होते आणि या चित्रपटाने जगभरात २९.९० कोटींचे कलेक्शन केले होते
Web Title: Raj kapoor took money from gangster and sold his wifes jewellery to complete bobby film avn