-
अजय देवगण आणि आर माधवन यांचा शैतान हा चित्रपट ८ मार्च २०२४ ला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित ‘शैतान’चे कथानक आणि स्टारकास्टचा अप्रतिम अभिनय सर्वांची मने जिंकत आहे. अनेक शो हाऊसफुल आहेत
-
‘शैतान’ हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुजराती चित्रपट ‘वश’ चित्रपटाचा रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
शैतानची कथा काळ्या जादूवर आधारित आहे. कबीर (अजय देवगण) ची मुलगी जान्हवीला (जानकी बोडीवाला) वनराज कश्यप (आर माधवन) या खलनायकाने काळ्या जादूच्या बळावर तिला वश केलेले असते.
-
अजय देवगणपेक्षाही आर माधवनची भूमिका अनेकांना भुरळ पाडत आहे, आणि त्याच्याही तोडीस तोड भाव खाऊन गेलेलं पात्र म्हणजे जान्हवी. अजय देवगणच्या मुलीचे पात्र गुजराती अभिनेत्री जानकी बोडीवालाने साकारले आहे
-
जान्हवीच्या भूमिकेत जानकीने तिच्या अभिनयाची अप्रतिम छाप सोडली आहे, जानकी ही अहमदाबाद येथील रहिवासी असून बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या आधी ती गुजराती चित्रपटांमध्ये काम करत होती
-
जानकीने छेल्लो दिवस, नाडी दोष, वश आणि ओ तारी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये मुख्य पात्र साकारले आहे. तिच्या शैतान मधील दमदार अभिनयाने तिला मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवले आहे.
-
२९ वर्षीय जानकीने अभिनय क्षेत्रात येण्याआधी गांधीनगरच्या गोएंका रिसर्च इन्स्टिट्यूटमधून दंतचिकित्सा विषयात पदवी प्राप्त केली होती. २०१५ मध्ये तिने ‘छेलो दिवस’ या गुजराती चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली
-
जानकीच्या सौंदर्याची सुद्धा सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होत असते. तिचे इंस्टाग्रामवर १४ लाख फॉलवर्स आहेत. २०१९ मध्ये तिने मिस इंडिया स्पर्धेत सुद्धा सहभाग घेतला होता
-
जानकीच्या ऑन-स्क्रीन वडिलांची भूमिका साकारणारा शैतानचा मुख्य अभिनेता अजय देवगण याने सुद्धा पत्रकार परिषदेदरम्यान कलाकारांबद्दल बोलताना जानकीचे भरभरून कैतुक केले आहे. ती चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे कारण तिने सगळ्यांना मागे टाकले आहे असेही अजय देवगण म्हणाला होता. (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
शैतानमध्ये अजय देवगणच्या मुलीची भूमिका केलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का? आर माधवन समोरही खाऊन गेली भाव
Shaitan Movie Casting: अजय देवगण आणि आर माधवन यांचा शैतान हा चित्रपट ८ मार्च २०२४ ला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. अजय देवगण, आर माधवनसारखे अभिनेते समोर असताना जान्हवीचे पात्र साकारणाऱ्या ‘जानकीने’ आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. पण ही जानकी नेमकी आहे कोण?
Web Title: Shaitan movie who played ajay devgan daughter janhavi aka janki bodewala black magic by r madhavan janki instagram photos svs