Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deputy chief minister devendra fadnavis wife amruta fadnavis share photos in blue shimmer gown pps

Photos: निळा शिमरी गाऊन, बोल्ड मेकअप अन्…; अमृता फडणवीस यांच्या ‘मिस वर्ल्ड २०२४’च्या स्पर्धेतील लूकने वेधलं लक्ष

अमृता फडणवीस यांचा ‘हा’ ग्लॅमरस लूक पाहा

Updated: March 11, 2024 18:59 IST
Follow Us
  • ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा ९ मार्चला भारतात पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. १९९७ साली ‘मिस वर्ल्ड’चं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. तब्बल २८ वर्षांनंतर यंदा भारतात मोठ्या दिमाखात ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा झाला. (फोटो सौजन्य - मिस वर्ल्ड इन्स्टाग्राम)
    1/9

    ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा ९ मार्चला भारतात पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. १९९७ साली ‘मिस वर्ल्ड’चं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. तब्बल २८ वर्षांनंतर यंदा भारतात मोठ्या दिमाखात ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा झाला. (फोटो सौजन्य – मिस वर्ल्ड इन्स्टाग्राम)

  • 2/9

    चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब पटकावला (Miss world 2024 Krystyna Pyszkova). तर भारताचं प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी ही टॉप-८ पर्यंत पोहोचू शकली. त्यानंतर टॉप-४च्या शर्यतीतून बाहेर झाली. (फोटो सौजन्य – मिस वर्ल्ड इन्स्टाग्राम)

  • 3/9

    ‘मिस वर्ल्ड २०२४’च्या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी १२ सदस्यांकडे होती. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा समावेश होता. त्यांनी या स्पर्धेत परीक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडली. (फोटो सौजन्य – अमृता फडणवीस इन्स्टाग्राम)

  • 4/9

    अमृता फडणवीस यांच्यासह क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, पत्रकार रजत शर्मा, बेनेट, कोलमन अँड को. लिमिटेडचे डिरेक्टर विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेअरमन आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर, हॉस्ट जामिल सैदी यांनी देखील परीक्षण केलं. (फोटो सौजन्य – अमृता फडणवीस इन्स्टाग्राम)

  • 5/9

    नुकतेच अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर ‘मिस वर्ल्ड २०२४’ स्पर्धेतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील त्यांच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो सौजन्य – अमृता फडणवीस इन्स्टाग्राम)

  • 6/9

    ‘मिस वर्ल्ड २०२४’च्या सोहळ्यात मिसेस उपमुख्यमंत्री निळ्या रंगाचा गाऊन, बोल्ड मेकअप आणि मोकळे केस अशा ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळाल्या. (फोटो सौजन्य – अमृता फडणवीस इन्स्टाग्राम)

  • 7/9

    अमृता फडणवीस यांचा हा ग्लॅमरस लूक चांगला चर्चेत आला आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – अमृता फडणवीस इन्स्टाग्राम)

  • 8/9

    हे ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत अमृता यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, सुमारे ३० वर्षांनंतर मुंबईत ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा आयोजित करण्यात आला होता. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. ‘मिस वर्ल्ड’च्या स्पर्धेत परीक्षकाची जबाबदारी मिळणं, हे माझ्यासाठी सन्मान असल्यासारखं होतं. (फोटो सौजन्य – अमृता फडणवीस इन्स्टाग्राम)

  • 9/9

    पुढे त्यांनी लिहिलं, “चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने ‘मिस वर्ल्ड’चा क्राउन व खिताब पटकावला तिचं मनापासून अभिनंदन. तसंच सर्व स्पर्धक सौंदर्यवतींना शुभेच्छा.” (फोटो सौजन्य – अमृता फडणवीस इन्स्टाग्राम)

TOPICS
अमृता फडणवीसAmruta FadnavisमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Deputy chief minister devendra fadnavis wife amruta fadnavis share photos in blue shimmer gown pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.