• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maratha quota activist manoj jarange patil sangharsh yoddha movie cast mohan joshi will play father role photos sdn

Photos: ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटात ‘हे’ सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका

२६ एप्रिलला ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Updated: March 19, 2024 12:19 IST
Follow Us
  • Sangharsh Yodha Movie Cast
    1/15

    Sangharsh Yodha Movie: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांनी ढवळून काढला.

  • 2/15

    मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे.

  • 3/15

    या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत.

  • 4/15

    २६ एप्रिलला ‘संघर्षयोद्धा’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

  • 5/15

    शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून, सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत.

  • 6/15

    तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.

  • 7/15

    या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.

  • 8/15

    या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

  • 9/15

    सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत.

  • 10/15

    अगदी खलनायकी भूमिकांपासून चरित्र भूमिकांपर्यंतचं वैविध्य त्यांच्या अभिनयात आहे.

  • 11/15

    आता मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका त्यांच्या आजवरच्या भूमिकांमध्ये एक लक्षणीय भूमिका ठरणार आहे.

  • 12/15

    स्वतःच्या मुलाचा संघर्ष, त्याची उपोषणं, राज्यभरातून मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा या काळात एका वडिलांची घालमेल मोहन जोशी यांच्या सशक्त अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

  • 13/15

    ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता फक्त २६ एप्रिल पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : संघर्षयोद्धा चित्रपट/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : वैदेही परशुरामीचा निळ्या साडीतील सुंदर लूक सोशल मीडियावर चर्चेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maratha quota activist manoj jarange patil sangharsh yoddha movie cast mohan joshi will play father role photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.