-
आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ही सध्या मराठी संगीत विश्वातील लाडकी जोडी झाली आहे. (फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
-
लग्न झाल्यापासून मुग्धा व प्रथमेश नेहमी चर्चेत असतात. (फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
-
दोघंही दैनंदिन जीवनातला अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अनेकदा दोघांना ट्रोल केलं आहे. पण प्रथमेशने सडेतोड उत्तर देऊन ट्रोलर्सचं तोंडही बंद केल्याच पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
-
नुकतंच मुग्धा व प्रथमेशने देवदर्शन केलं. यामागचं निमित्त देखील खास होतं. (फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
-
२१ मार्चला दोघांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले. २१ डिसेंबर २०२३ला मुग्धा व प्रथमेशने लग्नगाठ बांधली होती. (फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
-
लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने दोघांनी २३ मार्चला देवदर्शन घेतलं. (फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
-
मुग्धा व प्रथमेशने गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
-
या फोटोमध्ये मुग्धा निळ्या रंगाच्या साडीत, तर प्रथमेश फिकट हिरव्या रंगाच्या शॉर्ट कुर्तामध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
-
मुग्धा-प्रथमेशचा त्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “दोघंही गोड दिसताय”, “सुंदर. असेच आनंदी राहा. देवाचे तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहो”, “किती गोड”, “नांदा सौख्य भरे”, अशा प्रतिक्रिया दोघांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. (फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
Photos: मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे यांनी केलं देवदर्शन, निमित्त होतं खास…
मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेचे ‘हे’ फोटो झाले तुफान व्हायरल
Web Title: Mugdha vaishampayan and prathamesh laghate visit temple for completed 3 months of marriage photos viral pps