-
‘ताल’ हा अक्षय खन्नाच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस) -
‘दृष्यम 2’ मध्ये अक्षय खन्नाने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांची मने जिंकली.
(फोटो : अक्षय खन्ना/इन्स्टाग्राम) -
‘बॉर्डर’ या चित्रपटात अक्षय खन्ना देखील मुख्य भूमिकेत होता. या सुपरहिट चित्रपटामध्ये अक्षय खन्नाचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता. -
2003 मध्ये आलेल्या ‘हंगामा’ चित्रपटात अक्षय खन्नाने हे सिद्ध केले की तो पडद्यावर चांगली कॉमेडी देखील करू शकतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई ही केली होती.(फोटो : अक्षय खन्ना/इन्स्टाग्राम) -
अक्षय खन्नाने ‘रेस’ मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या ब्लॉकबस्टर चित्रपटात अनिल कपूर आणि सैफ अली खान देखील दिसले होते.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस) -
2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हमराज’. या चित्रपटात अक्षय खन्नाने एका खलनायकाची भूमिका उत्तम प्रकारे साकारली होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
Photos: ‘ताल’ ते ‘दृश्यम २’, अक्षय खन्नाने ‘या’ सात चित्रपटांमधून जिंकली प्रेक्षकांची मनं
अक्षय खन्ना जवळपास दोन दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. अभिनेता आज त्याचा ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया अक्षय खन्नाचे ‘ताल ते दृश्यम २’ सारखे चित्रपट ज्यामध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांकढून प्रशंसा मिळवली आहे.
Web Title: Photos from taal to drishyam 2 akshay khanna won the hearts of the audience in these seven films arg 02