-
मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री म्हणून वंदना गुप्ते यांना ओळखलं जातं.
-
आजवर त्यांनी चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
‘बकेट लिस्ट’, ‘टाइमप्लीज’, ‘पछाडलेला’, ‘बाईपण भारी देवा’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.
-
वैयक्तिक आयुष्यात त्यांनी शिरीष गुप्ते यांच्याशी लग्नगाठ बांधली.
-
बालपणी घरातच त्यांना कलाक्षेत्राचा वारसा लाभला.
-
वंदना गुप्ते या दिग्गज शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांच्या कन्या आहेत. तसेच त्यांच्या वडिलांचं नाव अमर वर्मा आहे.
-
कलाक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या भारती आचरेकर या वंदना गुप्तेंच्या सख्ख्या मोठ्या बहीण आहेत.
-
भारती आचरेकर, अरुणा जयप्रकाश, वंदना गुप्ते, राणी वर्मा या चारही जणी सख्ख्या बहिणी आहेत.
-
भारती आचरेकर हे मराठीसह हिंदी कलाविश्वातील मोठं नाव.
-
नुकत्याच भारती आचरेकर माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’मध्ये झळकल्या होत्या.
-
या चार बहिणींमध्ये अतिशय सुंदर असं बॉण्डिंग आहे.
-
वंदना गुप्ते यांनी कुटुंबीयांबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ( फोटो सौजन्य : वंदना गुप्ते इन्स्टाग्राम )
आई होती दिग्गज गायिका, तर मोठी बहीण सुप्रसिद्ध अभिनेत्री; जाणून घ्या वंदना गुप्तेंच्या माहेरच्या कुटुंबाबद्दल…
‘बाईपण भारी देवा’ फेम वंदना गुप्तेंची बहीण आहे लोकप्रिय अभिनेत्री, जाणून घ्या…
Web Title: Vandana gupte is daughter of late singer manik verma and sister of bharati achrekar sva 00