• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nilu phule was educated upto 3rd standard in madhya pradesh pps

Photos: निळू फुलेंचं मध्य प्रदेशात तिसरीपर्यंत झालं होतं शिक्षण, जाणून घ्या यामागचं कारण…

निळू फुले लहानपणी मध्य प्रदेशात का गेले होते?

Updated: April 4, 2024 17:51 IST
Follow Us
  • मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले. पण त्यातल्या काही कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यापैकी एक म्हणजे निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजे महाराष्ट्राचे लाडके निळू फुले.
    1/12

    मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले. पण त्यातल्या काही कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यापैकी एक म्हणजे निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजे महाराष्ट्राचे लाडके निळू फुले.

  • 2/12

    निळू फुलेंनी करारी आवाज व दमदार अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

  • 3/12

    मराठी सिनेसृष्टीतील जातीवंत कलाकार अशी ओळख असणाऱ्या निळू फुले यांच्या खलनायकाच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

  • 4/12

    निळू भाऊंनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका पाहून बायका बोटं मोडायच्या, शिवीगाळ करायच्या. प्रेक्षकांच्या याच प्रतिसादातून निळू भाऊंना त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली.

  • 5/12

    ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ यांसारख्या चित्रपटात निळू फुलेंनी साकारलेल्या भूमिका आजतागायत अजरामर आहेत.

  • 6/12

    निळू फुले जितके अभिनय क्षेत्रात सक्रिय होते तितकेच ते सामाजिक कार्यात देखील भाग घ्यायचे.

  • 7/12

    आज निळू भाऊंचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण निळू फुलेंनी मध्य प्रदेशात तिसरीपर्यंत शिक्षण का घेतलं? या मागचं नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊया…

  • 8/12

    निळू फुले ‘दूरदर्शन सह्याद्री’वरील ‘सृजनवेध’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळेस त्यांनी मध्य प्रदेशात तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्याचं सांगितलं होतं.

  • 9/12

    निळू फुले म्हणाले होते, “घरामध्ये मुलं जास्त असल्यामुळं थोडा जाणता मुलगा झाला की शिक्षणासाठी आमच्याकडे चुलत्याकडे मध्य प्रदेशला पाठवायचे. चुलते तेव्हा आमचे स्टेशन मास्तर म्हणून काम करत असे.”

  • 10/12

    “साधारण तिसरी-चौथीपर्यंत शिकवायचे आणि मग पुणं हे शिक्षणाचं चांगलं केंद्र म्हणून इकडे पुन्हा यायचं, अशी ती परिस्थिती होती. माझं मध्य प्रदेशात तिसरीपर्यंत शिक्षण झालं होतं,” असं निळू फुलेंनी सांगितलं होतं.

  • 11/12

    निळू फुले यांचं उर्वरित शालेय शिक्षण शिवाजी महाराज हायस्कूलला झालं होतं.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य – गार्गी फुले-थत्ते इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Nilu phule was educated upto 3rd standard in madhya pradesh pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.