• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mazhi tuzhi reshimgaath fame actress swati deval start new hotel with husband tushar deval photo viral

Photos: “माझं अजून एक स्वप्न पूर्ण…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीने पतीसह सुरू केलं हॉटेल, फोटो आले समोर

अभिनेत्रीच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी भाजपा मंत्र्यांनी लावली होती खास हजेरी

Updated: April 8, 2024 11:18 IST
Follow Us
  • Mazhi Tuzhi Reshimgaath fame actress swati deval start new hotel with husband tushar deval photo viral
    1/12

    ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका चांगलीच गाजली होती. अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.

  • 2/12

    ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील प्रत्येक पात्र हीट झाली. मग तो समीर असो, सीमा असो, शेफाली असो किंवा विश्वजीत प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्यापैकी एक म्हणजे मीनाक्षी वहिनी.

  • अभिनेत्री स्वाती देवल हिने मीनाक्षी वहिनी हे पात्र उत्कृष्टरित्या साकारलं होतं. त्यामुळे ते घराघरात पोहोचलं. आजही स्वातीला अनेक प्रेक्षक मीनाक्षी वहिनी या पात्राने ओळखतात.
  • 3/12

    याच मीनाक्षी वहिनीने म्हणजे अभिनेत्री स्वाती देवलने पती तुषार देवलसह व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलं आहे.

  • 4/12

    तुषार व स्वातीच्या ‘देवल मिसळ’च्या स्टॉलचं रुपांतर आता हॉटेलमध्ये झालं आहे.

  • काल, ५ एप्रिलला ‘देवल मिसळ’ या नव्या हॉटेलचं उद्घाटन झालं.
  • 5/12

    केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते स्वाती व तुषारच्या या नव्या हॉटेलचं उद्घाटन पार पडलं.

  • 6/12

    स्वाती व तुषारच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी पियूष गोयल यांच्यासह, गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, प्रकाश दरेकर, प्रकाश सुर्वे या भाजपाच्या मंडळींनी खास उपस्थिती लावली होती.

  • हॉटेलच्या उद्घाटनाचे फोटो शेअर करत स्वाती म्हणाली, “माझं अजून एक स्वप्नं पूर्ण झालं ते म्हणजे माझ्या (देवल मिसळ)चं आउटलेट चालू झालंय.” तिच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत.
    बोरीवली पूर्वेला स्वाती व तुषारने ‘देवल मिसळ’ हे हॉटेल सुरू केलं आहे.
  • 7/12

    दरम्यान, स्वातीच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती मुलगा स्वराध्य देवलसह झळकणार आहे.

  • 8/12

    ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत स्वाती व स्वराध्य एकत्र पाहायला मिळणार आहेत. (सर्व फोटो सौजन्य – स्वाती देवल इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Mazhi tuzhi reshimgaath fame actress swati deval start new hotel with husband tushar deval photo viral

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.