• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor kaustubh diwan married with kirti kadam photos viral pps

Photos: प्राजक्ता माळीसह झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, पाहा फोटो

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो होतायत तुफान व्हायरल

Updated: April 19, 2024 19:03 IST
Follow Us
  • मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिका चांगलीच गाजली होती.
    1/12

    मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिका चांगलीच गाजली होती.

  • 2/12

    ‘जुळून येती रेशीमगाठी’मधील प्राजक्ताने साकारलेल्या मेघनाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं.

  • 3/12

    प्राजक्ताच्या या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. याच मालिकेत प्राजक्ताचा बॉयफ्रेंड दाखवलेला ‘आदित्य नगरकर’ आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकला आहे.

  • 4/12

    अभिनेता कौस्तुभ दिवाणने ‘आदित्य नगरकर’ची भूमिका साकारली होती. कौस्तुभची ही भूमिका चांगलीच हिट झाली होती.

  • 5/12

    प्राजक्ता माळीबरोबर झळकलेल्या याच कौस्तुभचं काल, १८ मार्चला लग्न झालं.

  • 6/12

    कौस्तुभने किर्ती कदम हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं.

  • 7/12

    कौस्तुभ व किर्तीच्या लग्नाला अभिनेता आस्ताद काळे, त्याची पत्नी स्वप्नाली पाटील, मेघा धाडे, शिल्पा नवलकर, राजन ताम्हणे, अभिजीत केळकर या मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

  • 8/12

    सध्या हे मराठी कलाकार सोशल मीडियावर कौस्तुभ व किर्तीच्या लग्नाचे फोटो शेअर करून दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

  • 9/12

    लग्न विधीसाठी कौस्तुभ व किर्तीने मराठमोळा लूक केला होता. अभिनेत्याने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि केशरी रंगाचं धोतर परिधान केलं होतं. शिवाय कौस्तुभने या लूकवर पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. तसेच अभिनेत्याच्या बायकोने केशरी रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

  • 10/12

    लग्नाच्या रिसेप्शनला कौस्तुभ व किर्ती खूप सुंदर दिसत होते.

  • 11/12

    किर्तीने ब्राउन रंगाचा भरजरी लेहेंगा घातला होता. तर अभिनेत्याने बायकोला मॅचिंग करण्यासाठी ब्राउन रंगाची शेरवानी परिधान केली होती.

  • 12/12

    कौस्तुभच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो बऱ्याच मालिका, चित्रपटांमध्ये झळकला आहे. ‘बंध रेशमाचे’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे!’, ‘तुजं माजं सपान’ अशा अनेक मालिकांमध्ये त्यानं काम केलं आहे. कौस्तुभ हा अभिनयासह संवाद लेखन देखील करतो. (सगळे फोटो – कौस्तुभ दिवाणे इन्स्टाग्राम आणि लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Marathi actor kaustubh diwan married with kirti kadam photos viral pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.