Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress neha sharma road show for father and congress candidate ajit sharma in bhagalpur lok sabha seat kvg

Photo : अभिनेत्रा नेहा शर्माचा वडिलांसाठी प्रचार; लोक ट्रोल करत म्हणाले, “आयेगा तो…”

बॉलिवूडची अभिनेत्री नेहा शर्माने आपले वडील आणि काँग्रेसचे उमेदवार अजित शर्मा यांच्या प्रचारासाठी बिहारच्या भागलपूरमध्ये रोड शो केला. (सर्व फोटो @nehasharmaofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून)

April 26, 2024 15:52 IST
Follow Us
  • Bollywood Actress Neha sharma campaign for father
    1/11

    यंगीस्तान, तुम बिन २ अशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नेहा शर्मा सध्या आपल्या मुळ गावी बिहारच्या भागलपूरमध्ये आलेली आहे.

  • 2/11

    भागलपूर लोकसभा मतदारसंघातून तिचे वडील अजित शर्मा यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली असून आपल्या वडिलांचा प्रचार करण्यासाठी अभिनेत्री नेहा शर्मा रोड शो करत आहे.

  • 3/11

    या रोड शो चे काही फोटो नेहा शर्मा आणि अजित शर्मा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर अपलोड केले आहेत.

  • 4/11

    तसेच आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नेहा शर्माने आपल्या कुटुंबियांबरोबर लोकसभेसाठी मतदानही केले. तसेच सर्व मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहनही तिने केले.

  • 5/11

    यावेळी नेहा शर्मा म्हणाली, “भागलपुर नक्कीच जिंकेल, भागलपुरचाही विकास होईल. आशा आहे की, आपण सर्व मिळून विजयाचा आनंद साजरा करू. तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करा.”

  • 6/11

    मात्र अभिनेत्रा नेहा शर्माला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे.

  • 7/11

    अनेक युजर्सनी नेहा शर्माच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फोटोखाली “आयेगा तो मोदीही..”, अशा कमेंट केल्या आहेत.

  • 8/11

    तसेच काही युजर्सने काँग्रेसचा प्रचार केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही आमचे हृदय तोडले, अशा कमेंट करत काँग्रेसचा प्रचार केल्याबद्दल दुःख व्यक्त केले.

  • 9/11

    तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही चुकीचा पक्ष निवडला, अशाही कमेंट काहींनी केल्या आहेत.

  • 10/11

    ट्रोलर्सशिवाय नेहा शर्माच्या चाहत्यांनी मात्र तिचे कौतुक केले आहे.नेहमीच मॉडर्न आणि पाश्चिमात्य कपड्यांमध्ये दिसणारी नेहा शर्मा साडीत खूपच लाघवी दिसते, अशा कमेंट काहींनी केल्या आहेत.

  • 11/11

    नेहा शर्माने याआधीही आपल्या वडिलांसाठी प्रचार केलेला आहे. अजित शर्मा भागलपूर विधानसभा निवडणूक लढवित असताना नेहा शर्माने प्रचार केला होता. तेव्हा तिच्या वडिलांना विजय मिळाला होता.

TOPICS
निवडणूक प्रचारElection CampaignबिहारBiharबॉलिवूडBollywoodलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Bollywood actress neha sharma road show for father and congress candidate ajit sharma in bhagalpur lok sabha seat kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.