-
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आपल्या दमदार अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीह ओळखली जाते.
-
नुकताच तिचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत विद्याने बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्यापासून ते राजकारण व धार्मिक कार्यांसाठी देणग्या देण्याबाबत तिची मतं मांडली आहेत.
-
‘अनफिल्टर्ड विथ समदीश’ या मुलाखतीत विद्याला आपल्या देशात धार्मिक ध्रुवीकरण झालं आहे का? असं विचारण्यात आलं.
-
यावर उत्तर देत विद्या म्हणाली, “मला वाटतं की आधीपेक्षा आता खूप ध्रुवीकरण झालं आहे. पूर्वी देशात आपली कोणतीही धार्मिक ओळख नव्हती. मला असं वाटतंय की हे ध्रुवीकरण फक्त राजकारणातच नाही, तर सोशल मीडियावरही आहे. आपण जगात कुठेतरी हरवलो आहोत, आपण ती ओळख शोधतोय जी आपल्याजवळ आहेच नाही.”
-
विद्याने म्हणाली, “मी आरोग्य, स्वच्छता व शिक्षण या गोष्टींसाठी देणगी देते, पण धार्मिक कार्यासाठी अजिबात देणगी देत नाही.”
-
“धार्मिक वास्तू उभारण्यासाठी मला कोणी देणगी मागितली तर मी कधीच देत नाही. पण शाळा, शौचालये किंवा दवाखाने बांधत असाल तर मी आनंदाने देणगी देईन,” असं विद्या म्हणाली.
-
विद्या पुढे म्हणाली की ती धार्मिक आहे आणि रोज पूजा करते. पण, ती कधीच मंदिरात किंवा इतर ठिकाणी धार्मिक कारणांसाठी दान करत नाही.
-
विद्या पुढे म्हणाली की ती गणपती आणि दुर्गा देवीची सर्वात जास्त पूजा करते.
-
पण आपण कोणत्याही विशिष्ट धार्मिक रुढी-परंपरांचं पालन करत नाही, असंही तिने नमूद केलं.
-
“माझा देवावर विश्वास आहे. त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते,” असं विद्या म्हणाली.
-
“मी आध्यात्मिक व्यक्ती आहे, मात्र धार्मिक नाही. मी कोणत्याही विशिष्ट चालिरीती पाळत नाही, मला जे वाटतं ते करते,” असं विद्याने सांगितलं.
-
“लहानपणी आईकडून ज्या प्रार्थना व श्लोक मी शिकले, तेच करते पण ते माझ्या पद्धतीने करते,” असं विद्या म्हणाली.
-
(सर्व फोटो – विद्या बालन इन्स्टाग्राम)
“मी कधीच धार्मिक कार्यांसाठी देणगी देत नाही,” विद्या बालनचे विधान; म्हणाली, “आता खूप ध्रुवीकरण…”
विद्या बालनने आपण रोज गणपतीची पूजा करत असल्याचं सांगितलं. यावेळी तिने देशातील धार्मिक धृवीकरणाबाबतही मत मांडलं
Web Title: Vidya balan says she is religious but never donate money for religious purposes hrc