-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ व ‘शिवा’ या मालिकांमधून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरांत लोकप्रिय झाला.
-
छोट्या पडद्यावर शाल्वचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
आता वैयक्तिक आयुष्यात अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरशी लग्नगाठ बांधणार आहे.
-
शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफळापुरकर गेली अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर आहेत.
-
गेल्यावर्षी या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला होता.
-
आता शाल्व-श्रेयाची ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
नुकताच या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त पार पडला आहे.
-
परंतु, दोघांनी अद्याप लग्नाच्या तारखेची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. ( सर्व फोटो सौजन्य : शाल्व किंजवडेकर व श्रेया डफळापुरकर इन्स्टाग्राम @ wedding_by_rk )
ठरलं! ‘शिवा’ मालिकेतील अभिनेत्याची लगीनघाई, शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंडशी बांधणार लग्नगाठ
‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, लवकरच अडकणार विवाहबंधनात
Web Title: Shiva fame shalva kinjawadekar soon to get married shared muhurta photos sva 00