-
महानायक अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करतात.
-
या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये बिग बींचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतो.
-
प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांच्या सूट व स्कार्फमध्ये ते खूप छान दिसतात.
-
पण प्रत्येक वेळी अमिताभ यांना तयार कोण करतं हे तुम्हाला माहीत आहे का? तेच जाणून घेऊयात.
-
बिग बींच्या सर्व लूकचे संपूर्ण श्रेय त्यांची स्टायलिस्ट प्रिया पाटील हिला जातं.
-
बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध स्टायलिस्ट प्रिया पाटील ही अमिताभ बच्चन यांचा शोमधील लूक ठरवते.
-
फक्त शोपुरतेच नाही तर त्यांचे इतर कार्यक्रमातील लूकही प्रिया ठरवते.
-
सूट असो व हूडी, बिग बी प्रत्येक लूकमध्ये हँडसम दिसतात.
-
या त्यांच्या वेगवेगळ्या लूकमागे प्रिया पाटीलचा हात असतो.
-
अमिताभ बच्चन यांच्या स्टाइलचे चाहते असणाऱ्यांनी प्रिया पाटीलचं इन्स्टाग्राम पाहिल्यास तिथे बिग बींचे सुंदर फोटो पाहायला मिळतील.
-
मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रियाने भारत आणि यूकेमध्ये शिक्षण घेतलं आहे. यासोबतच तिने न्यूयॉर्क आणि इतर देशांमध्येही काम केलं आहे.
-
प्रिया अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मागील ८-९ वर्षांपासून काम करत आहे.
-
‘अमिताभ लिजेंड आहेत, त्यांना कोणत्याही स्टायलिस्टची गरज नाही,’ असं प्रियाला वाटतं.
-
अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्रिया इतरही सेलिब्रिटींचे लूक डिझाईन करते.
-
(सर्व फोटो – प्रिया पाटील इन्स्टाग्राम)
अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक स्टायलिश लूकमागे असतो ‘या’ मुंबईकर तरुणीचा हात, कोण आहे ती? जाणून घ्या
अमिताभ बच्चन यांचे लूक डिझाईन करणाऱ्या स्टायलिस्टबद्दल तुम्हाला माहितीये का?
Web Title: Who designs amitabh bachchan looks priya patil is big b stylist know about hrc