-
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. यातला तिचा लूक अगदीच खास आहे. (सर्व फोटो-स्पृहा जोशी, इंस्टाग्राम पेज)
-
स्पृहा इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे, तिच्या फोटोंवर कायमच लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.
-
स्पृहा जोशी तिच्या सुख कळले या सीरियलमुळे चर्चेत आहे. तसंच तिचा शक्तिमान हा सिनेमाही याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
-
स्पृहा ही मूळची मुंबईची. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. टिपिकल दादरकर. तिचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर या शाळेत झालं आणि तिथेच तिला तिच्यातील अभिनय, लेखन, वक्तृत्व हे सूप्तगुण गवसले.
-
स्पृहा दुसरीत होती तेव्हा तिने तिचं पहिलं बालनाट्य केलं होतं ज्याचं नाव होतं ‘दिनूचं बिल.’ हे नाटक विद्याताई पटवर्धन यांनी बसवलं होतं आणि त्यात त्यांनी स्पृहाला प्रमुख भूमिका दिली होती.
-
स्पृहाने नाटक, सिनेमा, वेब सीरिज अशा सगळ्याच माध्यमांमध्ये काम केलं आहे. एका लग्नाची तिसरी गोष्टमधली तिने साकारलेली इशा अजूनही लोकांच्या स्मरणात आहे.
-
स्पृहा कॉलेजमध्ये होती तेव्हा तिने तिचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला. ‘चांदणचुरा’ असं या तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाचं नाव.
-
२०१६ मध्ये तिने तिचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित केला ज्याचं नाव ‘लोपामुद्रा’. या कवितासंग्रहात दुसऱ्यांसाठी झटताना ज्या स्त्रियांची मुद्रा लोप पावलेली आहे त्यांचं चित्रण तिने तिच्या कवितांमधून केलं आहे.
-
२०११ मध्ये स्पृहाने तिचा ‘स्पृहा जोशी’ हा यूट्यूब चॅनल सुरू केला. सुरुवातीला ती त्यावर फारशी सक्रिय नव्हती. पण २०१७-१०१८पासून ती त्यावर सक्रियपणे तिच्या कविता चाहत्यांना ऐकवू लागली.
-
एक कवयित्री, अभिनेत्री म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या चाहत्यांची संख्याही कमी नाही. तिचे फोटो पाहून चाहते अनेकदा सुख कळले असंही म्हणतात.
स्पृहा जोशीच्या खास लूकने वेधलं लक्ष! चाहते म्हणतात ‘सुख कळले’
अभिनेत्री स्पृहा जोशी आणि आदिनाथ कोठारे यांचा चित्रपट याच महिन्यात रिलिज होतो आहे. स्पृहाने पोस्ट केलेले फोटो चर्चेत आले आहेत.
Web Title: Marathi actress spruha joshi post her stunning look photos on social media scj