-
अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या काही व्हायरल फोटोंमुळे चर्चेत आहे. (फोटो : @mrunalthakur/instagram)
-
मृणाल ठाकूर आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी मुंबईत रात्री उशिरा डिनरसाठी एकत्र जाताना दिसले. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
यावेळी दोघेही एकमेकांना मिठी मारताना आणि हात पकडून चालताना दिसले. या दोघांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो : @siddhantchaturvedi/instagram)
-
या व्हिडिओमध्ये दोघेही डिनरनंतर हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट करत आहेत आणि विचारत आहेत की दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत का? (फोटो : इन्स्टाग्राम)
-
मात्र, रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्तावर मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (फोटो: @mrunalthakur/instagram)
-
मृणालच्या आधी सिद्धांत चतुर्वेदीचे नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्याशी जोडले गेले होते.
-
सिद्धांत आणि नव्या अनेकदा व्हेकेशनला एकत्र जाताना दिसतात. काही वेळा तर ते सिनेमा पाहायला एकत्र गेल्याचे व्हिडीओ समोर आले होते. (फोटो: @siddhantchaturvedi/instagram)
-
सिद्धांत श्वेता बच्चन यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही गेला होता. (फोटो : @siddhantchaturvedi/instagram)
-
कामाबद्दल बोलायचं झाल्यास मृणाल आणि सिद्धांत लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. (फोटो – मृणाल ठाकूर इन्स्टाग्राम)
आधी बिग बींच्या नातीशी जोडलं गेलं नाव, आता मृणाल ठाकूरला डेट करतोय ‘हा’ अभिनेता? ‘त्या’ फोटोंमुळे होतेय चर्चा
बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
Web Title: Actress mrunal thakur photos viral with siddhant chaturvedi jshd import hrc