-
‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरांत लोकप्रिय झाली
-
छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर करिअरच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर काही वर्षे मालिकेत काम केल्यावर मृणाल नवऱ्याबरोबर अमेरिकेला राहायला गेली.
-
आता नुकतीच चार वर्षांनी ती भारतात परतली आहे.
-
तुम्हाला माहितीये का? मृणालचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिचं लग्न कसं जमलं याबद्दल खुलासा केला आहे.
-
मृणाल दुसानिस म्हणाली, “आमचं अरेंज मॅरेज झालं आहे. माझ्या बाबांच्या ओळखीच्या एका काकांनी आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं होतं.”
-
त्यानंतर अभिनेत्रीने नवऱ्याचा फोटो पाहिला होता. दोघांचं फोनवर बोलणं झालं मग, त्यानंतर मृणाल आणि नीरज यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं होतं.
-
“भेट झाल्यावर आम्ही दोघं ६ महिने फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होतो. तेव्हाच मी ठरवलं होतं की, हा मुलगा चांगला आहे आणि एकंदर मला तो आवडला होता.” असं मृणालने सांगितलं.
-
साध्या सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी जुळून आल्यावर मृणाल दुसानिसने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता या जोडप्याला नुर्वी नावाची गोड मुलगी आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम )
अमेरिका व्हाया मुंबई! ‘अशी’ आहे मृणाल दुसानिसच्या अरेंज मॅरेजची गोष्ट! कसं जमलं लग्न? जाणून घ्या…
अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या अरेंज मॅरेजची गोष्ट, लग्न कसं जमलं? अभिनेत्रीने मुलाखतीत केला खुलासा, म्हणाली…
Web Title: Marathi actress mrunal dusanis shares her arranged marriage love story sva 00