-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे अनेक कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले.
-
अभिनेता दत्तू मोरेला सुद्धा हास्यजत्रेमुळे घराघरांत एक नवीन ओळख मिळाली.
-
विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
-
दत्तू मोरेने गेल्यावर्षी लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. नुकताच त्याने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.
-
दत्तू मोरेला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्वातीने नवीकोरी बाईक गिफ्ट केली आहे.
-
दत्तूने या बाईकची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
-
दत्तूने या पोस्टला “लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट…खूप खूप थँक्यू बायको” असं कॅप्शन दिलं आहे.
-
अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर वनिता खरात, निखिल बने यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दत्तू आणि स्वातीने २३ मे २०२३ रोजी गुपचूप लग्नगाठ बांधली होती. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : दत्तू मोरे इन्स्टाग्राम )
लग्नाच्या वाढदिवशी बायकोने दिलं लय भारी गिफ्ट! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने शेअर केले नव्या बाईकचे फोटो
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेला पत्नीने दिलं खास गिफ्ट, लग्नाच्या वाढदिवशी भेट दिली बाईक
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame dattu more wife gifted him new bike sva 00