-
रविवारी ९ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना न्यूयॉर्कमध्ये खेळवण्यात आला.
-
हा सामना पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस न्यूयॉर्कला पोहोचल्या होत्या.
-
यावेळी त्यांची लेक दिविजा देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती.
-
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
भारताच्या विजयानंतर सगळ्या क्रिकेटप्रेमींनी एकत्र मिळून जल्लोष केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
-
टीम इंडियाने सामना जिंकल्यावर अमृता फडणवीस यांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला होता.
-
या फोटोंमध्ये अमृता फडणवीस लेक दिविजा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसह सामन्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
भारताने या स्पर्धेच्या इतिहासात सातव्यांदा पाकिस्तानला पराभूत केलं आहे.
-
या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ( सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस इन्स्टाग्राम )
IND vs PAK : भारताच्या विजयानंतर अमृता फडणवीसांचा आनंद गगनात मावेना! लेकीसह न्यूयॉर्कमधून शेअर केला व्हिडीओ
IND vs PAK : मॅच पाहण्यासाठी लेकीसह न्यूयॉर्कला पोहोचल्या अमृता फडणवीस, फोटो व्हायरल
Web Title: Amruta fadnavis went to new york for india pakistan t20 world cup match with daughter sva 00