-
सध्या एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेली मॉडेल झारा शतावरी हिचे नाव चर्चेत आले आहे. झारा शतावरी भारताकडून जगातील पहिल्या एआय सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. अशा स्थितीत, ती एआय मॉडेल कोण आहे आणि तिला कोणी तयार केले आहे? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. चला तर मग झाराबद्दल जाणून घेऊयात (@zarashatavari/Insta)
-
एआय मॉडेल्सची जगातील पहिली सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जात आहे. ब्रिटनच्या फॅनव्ह्यू कंपनीने वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्ड्स (WAICA) च्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. पहिल्या मिस एआय अवॉर्डसाठी त्यांनी टॉप १० नावंही निवडली असून त्यांची यादीही जाहीर केली आहे.
-
यामध्ये फ्रान्स, मोरोक्को, पोर्तुगाल आणि तुर्कीसह भारताच्या एआय मॉडेल्सना स्थान मिळाले आहे. ही सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या मॉडेलला भरघोस बक्षीसही दिले जाणार आहे.
-
झारा शतावरी एक फिटनेस इन्फ्लुएंसर आहे आणि तिचे सोशल मीडियावर खाते देखील आहे जिथे ती आरोग्य, शिक्षण आणि फॅशनशी संबंधित माहिती आणि सल्ले देते.
-
ही भारतीय एआय मॉडेल झारा शतावरी एका भारतीय मोबाइल जाहिरात एजन्सीचे सह-संस्थापक राहुल चौधरी यांनी तयार केली आहे.
-
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर झारा शतावरीची अनेक छायाचित्रे आहेत ज्यात तिचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. झारा सोशल मीडियावर लोकांना आरोग्याबाबतही जागरूक करते.
-
यासोबतच झारा लोकांना खेळाबाबतही जागरुक करताना दिसते. या सौदर्य स्पर्धेत १५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय मॉडेल्सने सहभाग घेतला होता. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या झाराची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे.
-
मिस एआय मुकुट जिंकणाऱ्या एआय मॉडेलला २० हजार डॉलर्स म्हणजे सुमारे १६ लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे.
PHOTOS : जगातली पहिली ‘एआय’ मॉडेल्स सौंदर्य स्पर्धा; अंतिम फेरीत भारताची ‘झारा शतावरी’! ‘इतकी’ आहे बक्षिसाची रक्कम
Miss AI Beauty Pageant, Zara Shatavari : आतापर्यंत आपण मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्ससारख्या सौंदर्य स्पर्धा होताना पाहिल्या आहेत. आता तंत्रज्ञानाच्या या बदलत्या जगात पहिली एआय सौंदर्य स्पर्धा होत आहे.
Web Title: Zara shatavari reached the world s first ai beauty contest from india know who she is spl