-
अलीकडेच फोर्ब्सने चित्रपट उद्योगातील सर्वांत श्रीमंत कलाकारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान अव्वल स्थानावर होता. शाहरुख ६,३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का दक्षिण सिनेसृष्टीतील सर्वांत श्रीमंत अभिनेता कोण आहे?
-
दक्षिण चित्रपटसृष्टीत अल्लू अर्जुन, राम चरण, थलपथी विजय व रजनीकांत या सुपरस्टार अभिनेत्यांची संपत्ती कैक कोटींची आहे.
-
फोर्ब्सच्या अहवालानुसार, थलपथी विजयकडे ४७४ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
दक्षिण सिनेसृष्टीतील दिग्गज मेगास्टार रजनीकांत ४३० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.
-
अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये आहे. आता जाणून घेऊ दक्षिणेतील अशा एका कलाकाराबद्दल जो या स्टार्सपेक्षाही श्रीमंत आहे.
-
दक्षिण सिनेमाचा मेगास्टार म्हणून अक्किनेनी नागार्जुन यांचे नाव घेतले जाते. नागार्जुन हे दक्षिणेतील सर्वांत अनुभवी कलाकारांपैकी एक आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागार्जुन यांची एकूण संपत्ती ३,१०० कोटी रुपये आहे; जी दक्षिण सिनेमातील कोणत्याही कलाकारापेक्षा जास्त आहे.
-
नागार्जुन एक यशस्वी व्यापारीदेखील आहेत. अन्नपूर्णा स्टुडिओ नावाचे त्यांचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. याव्यतिरिक्त ते इंडियन बॅडमिंटन लीगमधील मुंबई मास्टर्स संघाचे मालक आहेत.
-
नागार्जुनने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या रेसिंग टीम इंडियामध्येही गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय ते केरळ ब्लास्ट फुटबॉल क्लब आणि इंडिया सुपर लीग क्लबचे सह-मालक आहेत. नागार्जुन यांनी मोटारस्पोर्ट्स आउटफिट बनविणाऱ्या अनेक कंपन्यांमध्येही पैसे गुंतवले आहेत.
-
एवढेच नाही, तर त्यांचे हैदराबादमध्ये ‘एन कन्व्हेन्शन सेंटर’देखील आहे; जे देशातील सर्वांत मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरपैकी एक आहे. नागार्जुन यांचे ‘एन ग्रील’ व ‘एन एशियन’ नावाने रेस्टॉरंट्सही आहेत.
-
नागार्जुनचे देशातच नव्हे, तर परदेशातही व्यवसाय आहेत. दुबईच्या अनेक रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. नागार्जुन ‘मां टीव्ही’चे मालकदेखील आहेत.
-
अनेक व्यवसायांव्यतिरिक्त नागार्जुनची ‘ब्ल्यू क्रॉस’ नावाची एनजीओ आहे; ज्याद्वारे ते त्यांची पत्नी अमलासोबत गरिबांना मदत करतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी एक हजार एकर जंगल दत्तक घेतले होते आणि यासाठी त्यांनी तेलंगणा ग्रीन फंडला दोन कोटी रुपये दान केले होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
कोण आहे दक्षिणेतील सर्वांत श्रीमंत अभिनेता? अल्लू अर्जुन ते रजनीकांतपर्यंत सर्वांना टाकले मागे…
जाणून घ्या कोण आहे दक्षिण सिनेसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेता.
Web Title: Who is the richest south actor from allu arjun to rajinikanth he has everyone left behind arg 02