-
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. अर्जुन कपूरने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
-
२०१२ साली ‘इश्कजादे’ चित्रपटाद्वारे अर्जुनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अर्जुनने अभिनयात नाव कमावण्यासोबतच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कोट्यवधीची संपत्ती कमवली आहे.
-
अर्जुन कपूरकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शनदेखील आहे आणि मुंबईत एक आलिशान घरही आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूरची एकूण संपत्ती ११ मिलियन डॉलर्स म्हणजे ८५ कोटी रुपये आहे. या अभिनेत्याची बहुतेक कमाई चित्रपट आणि ब्रॅण्ड एंडोर्समेंटमधून होते.
-
अर्जुन कपूर एका चित्रपटासाठी आठ ते १० कोटी रुपयांचे मानधन घेतो. त्यासह ब्रॅण्ड एंडोर्समेंटसाठी तो सुमारे ६० लाख रुपये घेतो.
-
अर्जुन कपूरच्या वार्षिक कमाईबद्दल बोलायचे झाले, तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो दरवर्षी सुमारे १० कोटी रुपये कमावतो.
-
अभिनेत्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत. अर्जुन कपूरकडे २.४३ कोटी रुपयांच्या मर्सिडीज मेबॅक, लॅण्ड रोव्हर डिफेंडर व्होल्व्हो, मासेराती लेवांटे यांसारख्या लक्झरी गाड्या आहेत.
-
अर्जुन कपूरचा मुंबईतील जुहू येथे एक आलिशान फ्लॅट आहे; जिथे तो आपल्या बहीण अंशुला कपूरसोबत राहतो. त्याशिवाय त्याच्याकडे वांद्रे येथेही एक फ्लॅट आहे; ज्याची किंमत सुमारे २३ कोटी रुपये आहे.
Birthday Special: ३९ वा वाढदिवस साजरा करणारा ‘हा’ अभिनेता आहे कोट्यवधींचा मालक, अनेक फ्लॉप चित्रपट देऊनही कमावली ‘इतकी’ संपत्ती
बॉक्स ऑफिसवरील फ्लॉप चित्रपटांनंतर ही या बॉलीवूड अभिनेत्याकडे आहेत अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आणि कोट्यवधींची मालमत्ता. जाणून घ्या ३९ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या अभिनेत्याबद्दल.
Web Title: Birthday special celebrating 39th birthday this actor owns crores of property earned so much wealth despite many flop movies arjun kapoor arg 02