-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या सीरिजमध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल प्रमुख भूमिकेत झळकल्या आहेत. याच्यामधील एका अभिनेत्रीबरोबरच एक धक्कादायक प्रकार घडला होता. ज्याचा खुलासा तिनं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमधून केला.
-
‘हीरामंडी’मध्ये वहीदा पात्र साकारणाऱ्या संजीदा शेखबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला होता. ‘हॉटरफ्लाय’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं हा प्रसंग सांगितला होता.
-
संजीदा म्हणाली, “मला एक धक्कादायक प्रसंग आठवत आहे. पण तो कुठल्या मुलाकडून नाहीतर मुलीकडून झाला होता.”
-
“मी एका नाइट क्लबमध्ये गेली होती. त्यावेळी माझ्याबाजूने एक मुलगी जात होती,” असं अभिनेत्रीनं सांगितलं.
-
“त्या मुलीनं माझ्या स्तनांना स्पर्श केला आणि ती तिथून निघून गेली”, संजीदा म्हणाली.
-
पुढे अभिनेत्री म्हणाली की, या घटनेमुळे मला धक्का बसला होता. मला कळतं नव्हतं माझ्याबरोबर नेमकं काय घडलंय.
-
“आपण नेहमी ऐकतो की, पुरुष मागे मारतात, गैरवर्तणुक करतात. पण यात मुली काही कमी नाहीत,” असं स्पष्ट अभिनेत्री संजीदा म्हणाली.
-
दरम्यान, संजीदा शेखच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार आले आहेत. २०१२ मध्ये संजीदाने अभिनेता आमिर अलीबरोबर लग्न केलं होतं. पण लग्नाच्या १० वर्षांनंतर २०२२मध्ये तिचा घटस्फोट झाला.
-
संजीदाला एक मुलगी असून तिचा सांभाळ तिच करत आहे. (सर्व फोटो सौजन्य- संजीदा शेख इन्स्टाग्राम आणि लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Photos: नाइट क्लबमध्ये एका मुलीनं प्रसिद्ध अभिनेत्रीच्या स्तनांना केला स्पर्श अन्…, प्रसंग सांगत म्हणाली, “तिने…”
बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार वाचा…
Web Title: Heeramandi fame actress sanjeeda shaikh on being touched inappropriately by a woman pps