-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी चालू आहे. येत्या १२ जुलैला हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. (पीटीआय फोटो)
-
अनंत-राधिकाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मेन्यू असणार आहे. वाराणसीमधील प्रसिद्ध ‘काशी चाट भंडार’च्या टीमला यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांना बनारसी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी नीता अंबानी यांनी वाराणसीमधील काशी चाट भंडारला भेट दिली होती. यावेळी त्यांनी चाट, समोसा आणि कुल्फी फालूदा अशा विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतला होता.
-
हे पदार्थ नीता अंबानींना फारच आवडले होते. त्यामुळे अनंत-राधिकाच्या लग्नासाठी त्यांनी या काशी चाट भंडारच्या टीमला आमंत्रित केलं आहे.
-
बनारसमध्ये काशी चाट भंडार प्रचंड लोकप्रिय आहे. वाराणसी गोदौलिया येथे असलेल्या या दुकानाला ६० वर्षे झाली आहेत. हे दुकान काशिनाथ केसरी यांनी सुरू केलं होतं.
-
पालक चाट, टोमॅटो चाट, चना कचोरी आणि टिक्की या पदार्थांचा आस्वाद अनंत-राधिकाच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना घेता येणार आहे.
-
आता हे दुकान काशिनाथ यांची मुलं दीपक केसरी, राजेश केसरी आणि राकेश केसरी चालवतात.
-
दररोज सुमारे हजार ते बाराशे ग्राहक चाट चाखण्यासाठी याठिकाणी येतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये लोकांना तासन् तास रांगेत उभं राहावं लागतं. या दुकानात राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आवर्जून येतात.
-
काशी चाट भंडारची खास गोष्ट म्हणजे ते इतर दुकानांप्रमाणे चाट देण्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरत नाहीत. याठिकाणी कुल्हड भांडी वापरली जातात. यामुळे या चाटची चव अनेक पटींनी वाढते.
-
प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनीही या दुकाना भेट दिली आहे. याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos : लाडक्या मुलाच्या लग्नात नीता अंबानींनी ठरवला आहे जेवणाचा मेन्यू! पाहुण्यांसाठी असणार खास बनारसी पदार्थ
Photos : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात असणार जेवणाचा खास मेन्यू, जाणून घ्या…
Web Title: Anant ambani and radhika merchant wedding what is special about kashi chaat bhandar in varanasi jshd import sva 00