-
रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांकडून कौतुक मिळवणारी तृप्ती डिमरी पुन्हा एकदा ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
तृप्ती ही मूळची उत्तराखंड येथील गढवालची आहे. तिने २०१७ मध्ये श्रीदेवी यांच्या ‘मॉम’ व सनी देओलचा ‘पोस्टर बॉईज’ यांसारख्या चित्रपटांतून अभिनयात पदार्पण केलं.
-
साजिद अलीच्या ‘लैला मजनू’ मुळे तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर २०२० मध्ये आलेला ‘बुलबुल’ हा तिचा चित्रपट हिट ठरला होता.
-
ती अन्विता दत्तच्या ‘कला’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली होती, या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
-
रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात तृप्तीने झोया ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार केलं आणि ती नॅशनल क्रश बनली.
-
तृप्ती डिमरी सध्या तिच्या विकी कौशलसोबतच्या नवीन गाण्यासाठी चर्चेत आहे. ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील ‘जानम’ या गाण्यातील तृप्ती डिमरीच्या बोल्ड सीन्सची खूप चर्चा होत आहे. ‘जानम’ या गाण्यात विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांनी अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत.
-
वेगवेगळ्या चित्रपटातील कामांच्या जोरावर तृप्तीने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी राहत असलेल्या वांद्रेमध्ये घर घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर तृप्ती एका चित्रपटासाठी घेत असलेले मानधन आणि तिची एकूण संपत्ती जाणून घेऊया.
-
‘अॅनिमल’ रिलीज होण्यापूर्वी तृप्ती डिमरी एका चित्रपटासाठी २० ते २५ लाख रुपये मानधन घेत होती. मात्र तिला ‘अॅनिमल’साठी सुमारे ४० लाख रुपये मिळाले.
-
ॲनिमलच्या यशानंतर तृप्ती डिमरी यांनी तिची फी दुप्पट केली होती. आता अभिनेत्री एका चित्रपटासाठी ८० लाख रुपये मानधन घेते.
-
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, अभिनेत्रीने ‘बॅड न्यूज’ चित्रपटासाठी जवळपास ८० लाख रुपये शुल्क आकारले आहे.
-
चित्रपटांव्यतिरिक्त, तृप्ती दिमरी सोशल मीडिया, ब्रँड सहयोग आणि एड्समधून देखील भरपूर कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तृप्ती डिमरीची एकूण संपत्ती २५ ते ३० कोटी रुपये आहे.
-
ती लवकरच ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्ये राजकुमार रावबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच ती आता कार्तिक आर्यन आणि विद्या बालनबरोबर ‘भूल भुलैया ३’ चे शूटिंग करत आहे.
-
याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘धडक २’ हा सिनेमा आहे. (सर्व फोटो : तृप्ती डिमरी/सोशल मीडिया)
Tripti Dimri Property: विकी कौशलसह इंटिमेट सीन्स करणाऱ्या तृप्ती दिमरीने वाढवला मानधनाचा आकडा? ‘या’ माध्यमातूनही करते मोठी कमाई
Tripti Dimri Fees and Total Net Worth: वेगवेगळ्या चित्रपटातील कामांच्या जोरावर तृप्तीने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी राहत असलेल्या वांद्रेमध्ये घर घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर तृप्ती एका चित्रपटासाठी घेत असलेले मानधन आणि तिची एकूण संपत्ती जाणून घेऊया.
Web Title: Tripti dimri and vicky kaushal intimate scene in jaanam how much does actress charge for a film jshd import pvp