• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. late actors who appear in kamal haasan starer film indian 2 spl

‘इंडियन २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाआधीच ‘या’ अभिनेत्यांनी घेतला जगाचा निरोप; तरीही ते चित्रपटात कसेकाय दिसत आहेत? वाचा सविस्तर

Indian 2: सुपरस्टार अभिनेता कमल हासनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘इंडीयन २’ हा १२ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगली कमाईही केली आहे. दरम्यान, या चित्रपटात अभिनय करताना असेही काही अभिनेते दिसत आहेत, ज्यांनी आता या जगाचा निरोप घेतला आहे.

Updated: July 13, 2024 20:18 IST
Follow Us
  • indian 2 movie
    1/9

    कमल हासनचा ‘इंडियन २’ हा चित्रपट शुक्रवारी १२ जुलै रोजी सिनेमागृहात दाखल झाला आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी त्याचा परिणाम पाहायला मिळाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळाली आहे. हा चित्रपट १९९६ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘इंडियन’चा सिक्वेल आहे.

  • 2/9

    पण तुम्हाला माहित आहे का? की या चित्रपटात काही कलाकार असेही दिसत आहेत ज्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जगाचा निरोप घेतला आहे.

  • 3/9

    म्हणजे या कलाकारांनी चित्रपट साइन केला होता, पण दुर्दैवाने शूटिंग पूर्ण होण्यापूर्वी आणि चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. चला जाणून घेऊया या कलाकारांबद्दल.

  • 4/9

    एलांगोच्या भूमिकेत विवेक
    चित्रपटात सीबीआय अधिकारी एलांगोच्या भूमिकेत दिसणारे दिवंगत अभिनेते विवेक यांचे एप्रिल २०२१ मध्ये निधन झाले आहे. दरम्यान त्यांचे राहिलेले काही सीन एआय आणि व्हीएफएक्सच्या मदतीने शूट करण्यात आले आहेत, अशी माहिती दिग्दर्शक एस. शंकर यांनी दिली आहे.

  • 5/9

    इन्स्पेक्टर कृष्णस्वामीच्या भूमिकेत नेदुमुदी वेणू
    या चित्रपटाच्या पहिल्या भागात इन्स्पेक्टर कृष्णस्वामीच्या भूमिकेत दिसणारे दिवंगत अभिनेते नेदुमुदी वेणू पुन्हा त्यांची भूमिका पुढे साकारण्यासाठी सज्ज होते. परंतु दुर्दैवाने ऑक्टोबर २०२१ मध्ये कोविडची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्यांचेही एआय आणि व्हीएफएक्सच्या मदतीने राहिलेले सीन शूट करण्यात आले आहेत.

  • 6/9

    मनोबाला
    नंजुंदा मूर्तीच्या भूमिकेत दिसणारे दिवंगत अभिनेते मनोबाला यांनीही ‘इंडियन २’ रिलीज होण्यापूर्वी जगाचा निरोप घेतला आहे.

  • 7/9

    जी. मारीमुथू
    चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थच्या काकांच्या भूमिकेत दिसणारे दिवंगत अभिनेते जी. मारिमुथू यांनीही सप्टेंबर २०२३ मध्ये जगाचा निरोप घेतला आहे.

  • 8/9

    ‘इंडियन २’च्या शूटिंगदरम्यान या सर्व कलाकारांचे निधन होणे, हे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान होते. पण नवीन तंत्रज्ञानाच्या आणि व्हीएफएक्सच्या मदतीने चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या भूमिका जिवंत ठेवल्या आहेत. कदाचित, हा चित्रपट या दिवंगत कलाकारांच्या कामगिरीला आणि योगदानाला दिलेली एक श्रद्धांजलीच ठरत आहे, जी नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. (Stills From Film)

  • 9/9

    हेही वाचा – PHOTOS : अनंतच्या लग्नावर पाच हजार कोटी रुपये खर्च, तरीही मुकेश अंबानींची संपत्ती कमी होण्याऐवजी वाढली कशी? वाचा माहिती

TOPICS
कमल हासनKamal HaasanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Late actors who appear in kamal haasan starer film indian 2 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.