-
चित्रपट सर्व सामान्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम करतात. काही वर्षांपूर्वी अनेक चित्रपट सामान्य जीवनाचा एक भाग बनत होते, तेव्हा बरेचदा लोक चित्रपटांमध्ये जे घडले ते सत्य मानू लागायचे. असाच एक चित्रपट सुमारे ४५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, ज्याने सर्वसामान्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम केला.
-
जाणून घेऊया ७० च्या दशकातील एक जबरदस्त हॉरर चित्रपटाबद्दल. या चित्रपटात संजीव कुमार, सुनील दत्त, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद मेहरा, रीना रॉय, रेखा, नीतू सिंह आणि बिंदिया गोस्वामी सारखे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘जानी दुश्मन’ जवळपास १.३० कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता.
-
राजकुमार कोहली दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने जवळपास ९ कोटींची कमाई केली होती.
-
पण या चित्रपटात असे काही दृश्य दाखवण्यात आले ज्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाले. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना लाल कपड्यात आपल्या मुलींची लग्न करण्याची भीती वाटू लागली.
-
या चित्रपटात एका गावाची गोष्ट दाखवण्यात आली होती, ज्यामध्ये लग्नासाठी लाल पोशाख घातलेली वधू गायब व्हायची. या एका दृश्याचा लोकांच्या मनावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या मुलींना लग्नासाठी लाल कपडे देण्यास टाळाटाळ करू लागले.
-
आयएमडीबी च्या अहवालानुसार, या चित्रपटाचा लोकांच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की लोकांनी आपल्या मुलींचे लग्न लाल कपड्यांऐवजी केशरी किंवा गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये करायला सुरुवात केली. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘या’ चित्रपटामुळे लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती; ‘या’ कारणामुळे मुलींना लाल रंगाचे कपडे घालण्यासाठी होती मनाई
७० च्या दशकातील हा हॉरर थ्रिलर चित्रपट आपल्या अनोख्या कथा आणि दमदार अभिनयामुळे चर्चित राहीला होता. हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरच यशस्वी ठरला नाही तर या चित्रपटाने लोकांच्या हृदयात आणि मनातही एक विचित्र भीती निर्माण केली.
Web Title: Shatrughan sinha film created fear in peoples minds due to this reason girls were forbidden to wear red clothes in their wedding arg 02