-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने जूनमध्ये तिचा दीर्घकाळचा प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्न केले.
-
सोनाक्षीच्या वांद्रे येथील घरी कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह साधेपणाने पार पडला. आता सोनाक्षीने तिच्या लग्नाशी संबंधित काही खुलासे केले आहेत.
-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर या जोडप्याने २३ जून रोजी सिव्हिल मॅरेज केले. दोघांनी हिंदू किंवा मुस्लिम धर्मानुसार लग्न न करता नोंदणी पद्धतीने लग्न करण्यास पसंती दर्शवली.
-
सोनाक्षी आणि झहीरने कोर्ट मॅरेजचा मार्ग निवडला. यावेळी झहीर इक्बाल पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. सोनाक्षीने लग्नात तिची आई पूनम सिन्हाची ४४ वर्षे जुनी साडी नेसली होती.
-
तर तिच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्येही सोनाक्षी लाल बनारसी साडीत दिसली. आता सोनाक्षीने लग्नात साधी साडी नेसण्याचे कारण उघड केले आहे.
-
नुकतंच सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. यावेळी तिने सांगितले की, ‘मी साधी बनारसी साडी नेसली कारण मला आरामशीर राहायचे होते आणि मला माझ्या लग्नात सर्वात जास्त डान्स करायचा होता, जो मी केला.’
-
सोनाक्षी म्हणाली, “आम्हाला काय करायचे आहे हे आधीच माहित होते. मला बाकी काहीच माहित नव्हते, आम्ही एकमेकांसोबत होतो हेच महत्त्वाचे होते आणि हे असे काही होते जे आम्हाला खूप दिवसांपासून करायचं होतं.”
-
ती पुढे म्हणाली, ” सोहळा अतिशय लहान आणि जिव्हाळ्याच्या लोकांसोबत साजरा करावा अशी आमची इच्छा होती. आमचे रिसेप्शन एक मोठी पार्टी असावी जिथे प्रत्येकाला मजा करता येईल. मला माझे घर सर्वांसाठी मोकळे आणि खुले ठेवायचे होते.”
-
मी माझे केस विंचरत होते आणि मेकअप करत होते, लोक आत-बाहेर येत होते, मित्र-मैत्रिणी हँग आउट करत होते, सजावट आणि जेवण चालू होते, त्यामुळे ते खरोखर एक खुले घर होते आणि मला ते तसेच ठेवायचे होते. अशाप्रकारे हा कार्यक्रम अतिशय घरगुती आणि सुंदर झाला.”
-
सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात हुमा कुरेशीही होती. या चित्रपटात हुमा ही सोनाक्षीची खास मैत्रीण आहे. (All Photos : Sonakshi Sinha/Instagram)
साधेपणाने लग्न करण्याबाबत सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा; म्हणाली, “आम्हाला आधीपासूनच माहित होतं की…”
Sonakshi Sinha On Getting Married Simply: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर या जोडप्याने २३ जून रोजी सिव्हिल मॅरेज केले.
Web Title: Sonakshi sinha reveals about getting married simply with zaheer iqbal said we already knew that pvp