-
बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौतचे संसद सदस्यत्व रद्द होण्याची बातमी चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा खासदार कंगना रणौत यांच्या निवडणुकीला हिमाचल उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यानंतर अभिनेत्रीला नोटीस पाठवण्यात आली आहे. या याचिकेत कंगनाचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
या याचिकेवर उच्च न्यायालयाने कंगना राणौतला नोटीसही बजावली असून २१ ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. कंगना राणौतचा पुढचा चित्रपट इमर्जन्सी लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांची भूमिका महत्त्वाची आहे.
-
इमर्जन्सीमध्ये कंगना राणौत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतात लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे.
-
या चित्रपटात अनुपम खेर देखील आहेत जे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
इमर्जन्सीमध्ये श्रेयस तळपदे देखील आहे जो भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर अशोक छाबरा भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची भूमिका साकारणार आहे.
-
महिमा चौधरी या चित्रपटात पुपुल जयकरची भूमिका साकारताना दिसणार आहे. जयकर या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जवळच्या मैत्रीण होत्या.
-
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या आधी ही भूमिका विकी कौशलने साकारली होती जी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
-
विशाक नायर या चित्रपटात संजय गांधी यांची भूमिका साकारत आहे.
-
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक या चित्रपटात जगजीवन रामच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हे दोन्ही कंगना राणौतने केले आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात सॅम माणेकशॉसह, ऐतिहासिक भूमिका साकारणार ‘हे’ बॉलीवूड कलाकार; पाहा यादी
कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटात अनेक बॉलीवूड कलाकार ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहेत.
Web Title: Along with sam manekshaw in kangana movie emergency this bollywood actors will play a historical rolesee the list arg 02