-
बॉलीवूडच्या स्टार अभिनेत्रींपैकी एक आणि मंडीतील भाजप खासदार कंगना रणौत १२वीत नापास झाली आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावे पण १२वीत नापास झाल्यानंतर तिने पुढील शिक्षण सोडले.
-
बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या चित्रपटांपासून दूर आहे. अभिनेत्री केवळ ५वी पास आहे, त्यानंतर तिने अभिनयासाठी शिक्षण सोडले.
-
ऐश्वर्या राय बच्चननेही मॉडेलिंग आणि अभिनयासाठी आपले शिक्षण अर्धवट सोडले आहे. अभिनेत्रीने रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीसाठी प्रवेश घेतला होता, परंतु तिने पुढे अभिनयासाठी तिचे शिक्षण अर्धवट सोडले.
-
आलिया भट्टने अभिनयासाठी १२वी नंतरचे शिक्षण सोडले.
-
काजोलने शाळेत असतानाच तिचा अभ्यास सोडला होता. या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
-
वयाच्या १४ व्या वर्षी रेखाने शाळा सोडली आणि यानंतर ती अभिनयाच्या दुनियेत आली.
-
बॉलीवूडचा ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खान याने देखील अभिनयासाठी आपले कॉलेज सोडले.
-
रणबीर कपूरनेही दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. यानंतर त्याने शिक्षण सोडले. मात्र, नंतर त्यांनी न्यूयॉर्कमधून फिल्म मेकिंगचा डिप्लोमा केला.
ऐश्वर्या राय बच्चन ते आलिया भट्ट; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींचं शिक्षण आहे तरी किती? जाणून घ्या…
ऐश्वर्या राय बच्चनपासून आलिया भट्टपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयासाठी शिक्षण सोडले आहे.
Web Title: Aishwarya rai bachchan to alia bhatt how much education do these bollywood actresses havefind out arg 02