-
असे अनेक कलाकार आहेत जे बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी त्यांचे घर कुटुंब सोडून येतात. देशातीलच नाही तर परदेशातील लोकांनाही बॉलीवूडचे आकर्षण आहे.
-
अशाच प्रकारे एक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये नाव कमावण्यासाठी तिचा देश सोडून भारतात आली. येथे आल्यावर तिला खूप परिश्रम करावे लागले.
-
इतकेच नाही तर तिला तिच्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये झुरळ आणि पाल असलेल्या खोलीत राहावे लागले होते. यानंतर तिच्या मेहनतीला यश आले आणि तिला आमिर खान, अमिताभ बच्चन आणि इतर सुपरस्टार्ससोबत काम मिळाले.
-
असे असूनही या अभिनेत्रीला तिची वेगळी ओळख निर्माण करता आलेली नाही. या अभिनेत्रीचे नाव आहे एली अवराम. एली अवराम ही स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री आहे.
-
एलीने नेहमीच बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्टॉकहोम, स्वीडनमधील तिचे घर सोडले आणि भारतात आली.
-
एलीने ज्वेलरी शॉपमध्ये काम करून पैसे वाचवले आणि बॉलिवूडमध्ये अभिनय करिअर करण्यासाठी टूरिस्ट व्हिसावर मुंबईत आली.
-
एलीला बॉलिवूड अभिनेत्री बनायचे होते पण मुंबईत आल्यानंतर तिला खूप संघर्ष करावा लागला. ती परदेशी आणि एकटी असल्यामुळे तिला कोणीही भाड्याने घर द्यायला तयार नव्हते.
-
तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की ती एका झुरळे आणि पाली असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत होती आणि तिची भीती कमी करण्यासाठी तिने त्यांना आपले मित्र बनवले होते.
-
त्यानंतर एलीने मुंबईत मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिने एका मॉडेलिंग एजन्सीसोबत करार केला आणि लवकरच तिला वर्क व्हिसा मिळाला. एजन्सीने तिला वेगवेगळ्या ऑडिशनसाठी मदत केली.
-
यानंतर अक्षय कुमारबरोबरच्या एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडियासाठीच्या टीव्ही जाहिरातीतून तिला पहिला आणि महत्त्वाचा ब्रेक मिळाला.
-
यानंतर एलीने ‘मिकी व्हायरस’मधून मनीष पॉलसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तिला सलमान खानचा सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस 7 साठी बोलवण्यात आले. या शोने तिला ओळख मिळवून दिली तसेच तिचे नशीबही बदलले. यानंतर एलीला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
-
एली अवरामने कपिल शर्माच्या ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटातही काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
-
यानंतर एली ‘जबरिया जोडी’, ‘मलंग’, ‘गुडबाय’ आणि ‘गणपत’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, हे सर्व बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. पण तिचा आमिर खानसोबतचा हरफान मौला या डान्स नंबरने तिला खूप लोकप्रिय केले.
-
एली गेल्या सात वर्षांपासून मोठ्या हिट चित्रपटासाठी आसुसलेली आहे. अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही तिची कारकीर्द फ्लॉप ठरली आहे.
-
एली अवराम शेवटची सतीश आणि रेजिना कॅसांड्रा, नासार, आनंदराज, सारन्या पोनवन्नन, व्हीटीव्ही गणेश आणि रॅडिन किंग्सले यांच्यासमवेत ‘कन्जुरिंग कन्नप्पन’ या चित्रपटात दिसली होती.
-
एलीने अद्याप तिच्या कोणत्याही नवीन प्रकल्पाची घोषणा केलेली नाही, परंतु ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे 8.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
एकेकाळी झुरळ-पाली यांच्यासह एका खोलीत राहत होती ‘ही’ अभिनेत्री; कठोर परिश्रमानंतरही बसला ‘फ्लॉप’चा ठपका
असे अनेक कलाकार आहेत जे बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी त्यांचे घर कुटुंब सोडून येतात. देशातीलच नाही तर परदेशातील लोकांनाही बॉलीवूडचे आकर्षण आहे.
Web Title: In the beginning of her career elli avrram lived in a room with cockroaches and lizards despite hard work turned out to be a flop pvp