-
‘बिग बॉस ओटीटी 3’ विजेती आणि टीव्ही अभिनेत्री सना मकबूल सध्या तिच्या यशाचा आनंद घेत आहे. सना मकबूल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. (सना मकबुल/इन्स्टा)
-
खरंतर, तिचा प्रियकर श्रीकांत बुरेड्डी याने ते दोघे कधी लग्न करणार आहेत हे सांगितले आहे. (श्रीकांत बुरेड्डी/इन्स्टा)
-
जेव्हा सना मकबूलने बिग बॉस ओटीटी 3 ची ट्रॉफी जिंकली तेव्हा श्रीकांत बुरेड्डी देखील तिच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता. या शोनंतर दोघेही एकत्र फिल्मसिटी सोडताना दिसले. (सना मकबुल/इन्स्टा)
-
बिग बॉसच्या घरातही सना मकबूलने अनेकदा तिच्या नात्याचा उल्लेख केला आहे. घरामध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये सनाने सांगितले की ती तिच्या लग्नासाठी ‘मीट ब्रदर्स’ना बूक करणार आहे. (सना मकबुल/इन्स्टा)
-
बिग बॉस OTT 3 च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी श्रीकांत बुरेड्डी याने सना मकबूलसाठी एक भव्य बर्थडे पार्टी आयोजित केली होती ज्यामध्ये टीव्ही जगतातील अनेक स्टार्स उपस्थित होते. (श्रीकांत बुरेड्डी/इन्स्टा)
-
सना मकबूलचा प्रियकर श्रीकांत बुरेड्डी खूप श्रीमंत आहे आणि तो व्यवसायाने व्यापारी आहे. बुरेड्डी अनेक कंपन्यांचा मालक आहे. (सना मकबुल/इन्स्टा)
-
तीन मिनिटांत कर्जाची हमी देणारे बडी लोनचे ते संस्थापक आहेत. सना मकबूल ही श्रीकांत बुरेडीच्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे. (श्रीकांत बुरेड्डी/इन्स्टा)
-
श्रीकांत बुरेड्डी व्हिसल कंपनीचे दूरदर्शी आणि सह-संस्थापक आहे. यासह, तो व्हॅल्युलीफ सर्व्हिसेस इंडियाचे सह-संस्थापक आणि संचालक आहे. (श्रीकांत बुरेड्डी/इन्स्टा)
-
सना मकबूल जेव्हा शोमधून बाहेर पडत होती तेव्हा तिचा प्रियकरही तिच्यासोबत होता. श्रीकांत बुरेड्डी याला जेव्हा विचारण्यात आले की त्यांचे लग्न कधी होणार आहे, तेव्हा त्याने हसून सांगितले की याबाबत हळूहळू सर्वांना कळेल. (सना मकबुल/इन्स्टा)
-
पुढे, जेव्हा त्याला विचारले गेले की दोन महिन्यात लग्न करणार आहे का? त्यावर श्रीकांत म्हणाला, दोन महिन्यांत नाही कारण वेळ लागेल पण लग्न नक्की होईल. (सना मकबुल/इन्स्टा)
Bigg Boss OTT3 Winner सना मकबूलच्या लग्नाची तारीख ठरली? खुद्द बॉयफ्रेंड श्रीकांत बुरेड्डीने केला खुलासा
‘बिग बॉस ओटीटी 3’ विजेती आणि टीव्ही अभिनेत्री सना मकबूल सध्या तिच्या यशाचा आनंद घेत आहे. सना मकबूल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
Web Title: Sana makbul s boyfriend srikanth bureddy told that both will get married soon jshd import pvp