-
‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे (Heymal Ingley) तर अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) ही जोडी सचिन-सुप्रिया (Sachin & Supriya Pilgaonkar) यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत.
-
नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर (Movie Teaser) सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
-
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र (Sushriya Chitra) या निर्मिती संस्थेने केली आहे.
-
या चित्रपटाची कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत.
-
अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.
-
‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो.
-
त्यामुळे आता ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.
-
या टीजर मधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत असून ८० कोटीचे हिरे आता ८०० कोटीचे झाले आहेत.
-
त्यामुळे हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकांना केवळ २० सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नवरा माझा नवसाचा २/इन्स्टाग्राम)
Photos: ‘८० कोटींचे हिरे आता…’; नवरा माझा नवसाचा २ चित्रपटाबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?
नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
Web Title: Sachin pilgaonkar upcoming marathi movie navra maza navsacha 2 teaser released film information sdn