-
अभिनेत्री वनिता खरात आणि अभिनेत्री स्नेहल शिदम या महाराष्ट्रातील दोन विनोदी अभिनेत्री आहेत.
-
मात्र खूप कमी लोकांना माहित असेल की वनिता आणि स्नेहल या खूप जुन्या मैत्रिणी आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच वनिताने स्नेहलबरोबरचे काही जुने फोटो पोस्ट करत त्यांच्या मैत्रीला १० वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले.
-
वनिता आणि स्नेहल अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो पोस्ट करत असतात.
-
दोघीही सध्या दोन वेगवेगळ्या आणि लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांचा भाग आहेत.
-
दहा वर्षांपूर्वीच्या या फोटोंमध्येही वनिता आणि स्नेहल आतासारख्याच दिसत आहेत.
-
महाराष्ट्रातील प्रेक्षक या दोन्हीही विनोदी अभिनेत्रींवर मनापासून प्रेम करतात.
-
या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटलंय, “मला वाटायचं तुम्ही दोघी बहिणी आहात.”
-
तर दुसऱ्याने म्हटलं आहे, “इथे तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येउद्या’ एकत्र आले आहेत.”
-
महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या दोन विनोदी अभिनेत्रींना ओळखलं का? (फोटो : वनिता खरात आणि स्नेहल शिदम सोशल मीडिया)
महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या ‘या’ दोन विनोदी अभिनेत्रींना ओळखलं का? १० वर्ष जुने फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का
महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या दोन विनोदी अभिनेत्रींना ओळखलं का?
Web Title: Do you know these two comedy actresses who make maharashtra laugh vanita kharat snehal shidam fans were shocked to see old photos pvp