-
मनीष मल्होत्रा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत. (Photo Source: @manishmalhotra05/instagram)
-
अलीकडेच त्यांनी आपल्या मुलाखतीत एका चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितले. (Photo Source: @manishmalhotra05/instagram)
-
मनीष मल्होत्रा यांनी ‘वुई आर युवा’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “धडकन’ चित्रपटातील ‘दिल ने ये कहा है दिल से’ हे गाणे स्वित्झर्लंडमध्ये शूट केले जात होते. या चित्रपटातील गाण्यात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी होते. ” (Still From Movie)
-
मनीष पुढे म्हणाले की, गाण्याच्या शूटिंगपूर्वी मी अक्षयला छातीचे केस ट्रिम करण्यास सांगितले, ते ऐकून अक्षयला धक्का बसला आणि राग आला होता. (Photo Source: @manishmalhotra05/instagram)
-
मनीष यांनी सांगितले की, “खरेतर, मी अक्कीला (अक्षय कुमार) या गाण्यासाठी पांढरा शर्ट दिला होता. त्यामुळेच त्याने गाण्यासाठी त्याच्या छातीचे केस कापावेत अशी माझी इच्छा होती. माझे हे म्हणणे ऐकून अक्षय घाबरला होता.” (Photo Source: @manishmalhotra05/instagram)
-
मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी आपल्या मुद्द्याचे समर्थन करत ही योग्य गोष्ट असल्याचे सांगितले. मात्र या घटनेचा अक्षय आणि त्यांच्या नात्यावर कसा परिणाम झाला याबद्दल बोलणे मनीष यांनी टाळले. (Photo Source: @manishmalhotra05/instagram)
-
डिझायनरने सांगितले की, “त्या काळात अभिनेत्री त्यांच्या पोशाखांबाबत स्ट्रीक्ट होत्या, पण अभिनेते त्याची फारशी काळजी घेत नसत. प्रसंग कोणताही असो, नायिकांसाठी सेक्सी दिसणे महत्त्वाचे असते.” (Photo Source: @manishmalhotra05/instagram)
-
मनीष म्हणाले, “मला एक किस्सा आठवतो की एक अभिनेत्री अंतिम संस्कारासाठी जाणार होती आणि ती सेक्सी दिसली पाहिजे असे तिचे म्हणणे होते, मी फक्त विचार करत राहिलो की याचा काय अर्थ होतो?.
(Photo Source: @manishmalhotra05/instagram)
Photos : मनीष मल्होत्रा यांनी जेव्हा अक्षय कुमारला छातीवरील केस ट्रिम करण्यास सांगितले तेव्हा…
Manish Malhotra: मनीष मल्होत्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, एका चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांनी अक्षय कुमारला छातीचे केस ट्रिम करण्यास सांगितले होते, ज्यावरून अक्षयला धक्का बसला आणि राग आला होता.
Web Title: Akshay kumar horrified by manish malhotra suggestion to trim chest hair for dhadkan song spl